दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड येत्या १० नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत. निवृत्तीच्या दिवशी ते काही मोठे निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे. यातीलच एक महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत अत्यंत महत्वाचा निर्णय म्हणजे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा असणार आहे.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणावर सुनावणी कधी होणार? याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाविरोधात उद्धव ठाकरे यांनी याचिका दाखल केली होती. आता यावर मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी सुनावणी होणार आहे. त्यामुळे या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.
त्याचबरोबर अलीगढ मुस्लिम विद्यापीठाला अल्पसंख्याक दर्जा, मदरसा कायद्याची वैधता, सरकारी संपत्तीचे पुनर्वितरण, वाहन परवाना कायदा तसेच सरकारी नियुक्ती प्रक्रियेतील नियमांबद्दलच्या विषयां सुद्धा निर्णय देणार असल्याची माहिती मिळत आहे.