Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

 एका लग्नाची गोष्ट..! दोघी पहिल्यांदा मंदिरात भेटल्या, मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं अन् सामाजिक रूढींना झुगारून दोन तरुणींनी बांधली लग्नगाठ 

Santosh Mundeby Santosh Munde
Thursday, 6 November 2025, 15:51

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील सुंदरबन प्रदेशात एका समलिंगी विवाहमळे सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा निर्माण झाली आहे. 19 वर्षीय रिया सरदार आणि 20 वर्षीय राखी नास्कर या दोन नृत्यांगना असलेल्या तरुणींनी सामाजिक बंधने झुगारून एकमेकांसोबत आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला आणि एका मंदिरात विवाह केला आहे.

 

रिया (सुंदरबनची रहिवासी) आणि राखी (कुलताली, बकुलतला येथील) यांची दोन वर्षांपूर्वी एका मंदिरात भेट झाली होती. मैत्रीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले. समाजात समलिंगी संबंधांना विरोध असला तरी, त्यांनी एकत्र येण्याचा धाडसी निर्णय घेतला.

 कुटुंबीयांकडून संमिश्र प्रतिक्रिया

या विवाहाला रियाच्या कुटुंबाने पूर्ण पाठिंबा दिला आहे, ज्यामुळे हे लग्न शक्य झाले. मात्र, राखीच्या कुटुंबाने सुरुवातीला या संबंधाला विरोध दर्शवला होता. परंतु, या दोघींनी मित्रांच्या मदतीने अखेर मंदिरात लग्नगाठ बांधली. त्यांच्या या अनोख्या लग्नाला गावकऱ्यांनी उपस्थिती लावली.

रिया सरदार म्हणाली, “मला राखी आवडते, म्हणूनच आम्ही लग्न केले आहे. मी आयुष्यभर तिच्यासोबत राहीन.”  तर राखी नास्कर म्हणली,  “आम्ही दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहोत आणि एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला माझ्या कुटुंबाने रियाला स्वीकारले नव्हते, पण रियाच्या कुटुंबाने मला स्वीकारले, ही समाधानाची गोष्ट आहे.”

समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता मिळण्याच्या चर्चा देशात सुरू असताना, सुंदरबनमधील या तरुणींनी प्रेमासाठी सामाजिक रूढींना दिलेले आव्हान विशेष लक्षवेधी ठरले आहे.

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

बारामतीत चॉकलेटचे आमिष दाखवून दहा वर्षांच्या बालिकेवर अत्याचार; नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Tuesday, 7 April 2026, 16:59

पुण्यात बंटी-बबलीचा कारनामा! मावळमध्ये नवरा-बायकोने व्यावसायिकाला घातला लाखोंचा गंडा; 26 लाख घेऊन दोघंही पसार

Tuesday, 7 April 2026, 16:54

लोणी काळभोर येथे कारने दिलेल्या धडकेत आजीचा जागीच मृत्यू

Tuesday, 7 April 2026, 16:50

लोणी काळभोरमध्ये रॅपिडो चालकावर हल्ला! भाड्याच्या वादातून दगडांनी बेदम मारहाण; जखमीवर आयसीयूमध्ये उपचार सुरु

Tuesday, 7 April 2026, 16:41

मुंबईत व्यापाऱ्याला 17.5 कोटींचा चुना! पुण्यातील जमिनीच्या नावाने घातला गंडा; बाप-लेकाचा काळा कारनामा उघड

Tuesday, 7 April 2026, 16:19

बारा महिने सर्दी? याकडे दुर्लक्ष करू नका; असू शकतो ‘हा’ गंभीर आजार!

Tuesday, 7 April 2026, 16:10
Next Post
Sugarcane transport violations increase in Bhigwan area! Tractor-trolleys running without RTO passing; Risk of accidents due to decorations, black film and loud silencers

भिगवण परिसरात ऊस वाहतुकीचा नियमभंग वाढला! आरटीओ पासिंगशिवाय धावणाऱ्या ट्रॅक्टर–ट्रॉली; सजावट, काळी फिल्म आणि कानठळ्या सायलेंसरमुळे अपघातांचा धोका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.