Tuesday, October 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भिगवण परिसरात ऊस वाहतुकीचा नियमभंग वाढला! आरटीओ पासिंगशिवाय धावणाऱ्या ट्रॅक्टर–ट्रॉली; सजावट, काळी फिल्म आणि कानठळ्या सायलेंसरमुळे अपघातांचा धोका

सागर जगदाळेby सागर जगदाळे
Thursday, 6 November 2025, 16:26
Sugarcane transport violations increase in Bhigwan area! Tractor-trolleys running without RTO passing; Risk of accidents due to decorations, black film and loud silencers

photo - social media

पुणे:  भिगवण परिसरातून दररोज ऊस वाहतुकीसाठी ट्रॅक्टर–ट्रॉलींची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. परिसरातील सात ते आठ साखर कारखान्यांकडे ऊस नेण्यासाठी शेकडो ट्रॅक्टर धावत असतात; परंतु या वाहतुकीत नोंदणी क्रमांक नसलेली आणि आरटीओ पासिंगशिवाय चालवली जाणारी वाहने मोठ्या प्रमाणात दिसून येतात. यामुळे भविष्यात जीवितहानी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

काही ट्रॅक्टरवर झगमगत्या लाईट्स, रंगीबेरंगी सजावट आणि कानठळ्या बसवणारे “बडीमार” सायलेंसर लावलेले दिसतात. या सजावटीमुळे चालकाला समोरील वाहन नीट दिसत नाही. रात्रीच्या वेळी झगमगत्या प्रकाशात दुचाकीस्वारांचा तोल जातो आणि अपघात अनिवार्य ठरतात. विशेष म्हणजे, चारचाकी वाहनांवरील काळ्या फिल्मवर पोलीस कारवाई करतात; मग ट्रॅक्टरवरील अनधिकृत सजावट, सायलेंसर आणि क्रमांकफलक नसलेली वाहतूक यावर कारवाई का होत नाही, असा सवाल नागरिक विचारत आहेत.

भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे म्हणाले,

“ऊस गळीत हंगाम सुरू होताच ट्रॅक्टर चालकांना वाहन सुरक्षिततेचे नियम पाळण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच सोशल मीडियाद्वारे जनजागृती सुरू आहे. लवकरच रस्ते सुरक्षा विषयक प्रबोधन इतर माध्यमांतून करण्यात येईल.”

दरवर्षी ऊस वाहतुकीतून अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होतात. एखादा कमावता पुरुष अपघातात मृत्युमुखी पडल्यावर मागे रडणारी आई, विधवा बायको आणि लेकरांचे ओरडणे उरते. त्यामुळे रस्त्यांवरील नियमभंग पाहत असतानाही प्रशासन शांत का आहे, हा प्रश्न नागरिकांमध्ये अधिक टोकदार होत आहे.

 

प्रशासनाची हालचाल सुरू

वाढत्या नियमभंगाच्या पार्श्वभूमीवर फ्लाईंग स्कॉडला तातडीने कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक साखर कारखान्याशी पत्रव्यवहार करून ट्रॅक्टर चालकांना सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच प्रत्येक कारखान्यावर जाऊन प्रबोधनपर कार्यक्रम घेऊन वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यास सांगितले जाणार आहे, अशी माहिती बारामती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी दिली.

अधिकाऱ्यांनी केवळ दंड आकारून थांबू नये, तर प्रत्यक्ष पातळीवर उतरून ठोस कारवाई करणे आवश्यक आहे. अन्यथा रस्त्यावर जीव गमावणाऱ्यांची संख्या वाढत राहील आणि जबाबदारी कोणाची, हा प्रश्न कायम अनुत्तरीत राहील.

भिगवण परिसरातील रस्त्यांवर नियमांचा सन्मान पुन्हा प्रस्थापित करायचा असेल, तर प्रशासनाने सातत्यपूर्ण व प्रभावी कारवाई करणे अत्यावश्यक आहे. तेव्हाच नागरिकांचा जीव वाचेल आणि ऊस वाहतूक शिस्तबद्ध मार्गाने चालेल.

सागर जगदाळे

सागर जगदाळे

अडीज वर्ष दैनिक पुण्यनगरी काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये भिगवण येथील प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील बातम्या लिहिण्याचा खूप मोठा अनुभव आहे.

ताज्या बातम्या

उद्योजक राणा सूर्यवंशींवरील जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी तिघे जेरबंद; कर्वेनगरमधून दोघे, तर भिगवण परिसरातून तिसरा आरोपी ताब्यात

Tuesday, 20 October 2026, 19:50

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या पशुपालकांसाठी राज्य सरकारचा दिलासादायक निर्णय; चारा बियाणे योजनेच्या अटी शिथिल

Tuesday, 20 October 2026, 19:44

लाडक्या बहिणींनो या दिवाळीत दुप्पट रक्कम खात्यात जमा होणार? थेट ३ हजार रुपये मिळणार? जाणून घ्या सविस्तर

Tuesday, 20 October 2026, 19:24

दूध अन् तेलानंतर आता मुंढेंचा मोर्चा मसाल्यांकडे! मसाल्यांच्या उत्पादन, वाहतूक आणि विक्रीसंदर्भात कडक आदेश जारी

Tuesday, 20 October 2026, 19:15

पुणेकरांसाठी मोठी बातमी! म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यास तिसऱ्यांदा मुदतवाढ; आता ३० ऑक्टोबरपर्यंत संधी

Tuesday, 20 October 2026, 18:46

टायगर श्रॉफ लक्ष्य नव्हताच! हल्लेखोरांच्या निशाण्यावर होता मोठा व्यक्ती; आरोपीच्या स्टेटमेंटने तपासाला वेगळं वळण..

Tuesday, 20 October 2026, 17:48
Next Post
Pakistan Afghanistan War: The shadow of war looms over the world..! There will be a terrible war..; Pakistan's threat creates a stir at the global level

Pakistan Afghanistan War: जगावर युद्धाचं सावट..! भयंकर युद्ध होणार..; पाकिस्तानच्या धमकीने जागतिक पातळीवर खळबळ  

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp