काठमांडू : नेपाळमधील काठमांडू शहरामधून एक भयंकर घटना घडल्याची बातमी समोर येत आहे. ४० प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळून मोठी दुर्घटना घडली असून बसचं मोठं नुकसान झालं आहे. अपघात झालेल्या 40 प्रवाशांबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन विभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहचले.
नेपाळच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बस पोखराहून काठमांडूला जात होती. ४० भारतीयांना घेऊन जाणारी भारतीय बस तनहुन जिल्ह्यातील मार्सयांगडी नदीत कोसळली. सध्या या अपघातातील जीवितहानीबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. प्राथमिक माहितीनुसार या बसचा नंबरप्लेट UP FT ७६२३ आहे. हा अपघात शुक्रवारी सकाळी ११. ३० वाजताच्या सुमारास झाला आहे.