आग्रा: जग प्रसिद्ध असलेल्या ताजमहालला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. धमकीचा ई-मेल मिळाल्यानंतर ताज येथील पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे. बॉम्ब निकामी करणारे पथक आणि इतर पथके दाखल झाली असून ती तपासात गुंतली आहेत.
दरम्यान ताजमहालला बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली होती. ई-मेल मिळाल्यानंतरच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. ताजची सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्यात आली. सोबतच बॉम्ब निकामी पथक आणि श्वान पथकही येथे दाखल झाले. या तपासणीदरम्यान पर्यटकांमध्ये कोणतीही दहशत निर्माण होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात येत आहे.
ताजमहाल बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे पाठवण्यात आली आहे . धमकीचा ई-मेल मिळाल्यानंतर ताज येथे पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे. बॉम्ब निकामी करणारे पथक आणि इतर पथके दाखल झाली असून ते तपासात गुंतले आहेत. डीसीपी सिटी सूरज राय यांनी सांगितले की, ताजमहालभोवती आधीच सुरक्षा आहे. ती आणखी मजबूत करण्यात आली आहे. सर्वत्र कसून तपासणी केली जात आहे. कोणत्याही प्रकारची संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही.