अमेरिका: ट्रम्प प्रशासनाच्या धोरणांविरुद्ध संताप व्यक्त करत हजारो नागरिक अमेरिकेत रस्त्यावर उतरले आहेत. निदर्शकांनी ट्रम्प प्रशासना धोरणांचा निषेध करणारे फलक आणि बॅनर घेत जोरदार घोषणाबाजी केली. नव्या सरकारविरोधात इतक्या लवकरच संतापाची लाट उसळल्याने सरकारला धक्का बसल्याचे मानले जात आहे. अनेक निदर्शकांनी LGBTQ+ हक्कांवरील प्रशासनाच्या भूमिकेला विरोधही व्यक्त केला, काहींच्या हातात “प्रेम म्हणजे प्रेम” आणि “सर्वांसाठी समानता” असे लिहिलेले फलक होते. प्रमुख शहरांसह अमेरिकेतील २०० हून अधिक शहरांमध्ये निदर्शने करण्यात आली. कर्मचाऱ्यांची कपात, महागाईवाढ, ‘एलजीबीटीक्यू’ समुदायाविरोधातील अध्यादेश आणि इतर अनेक निर्णयांचा व धोरणांचा निषेध करण्यात आला आहे. दरम्यान, नागरिक इतके संतापले आहेत कि, त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती एलॉन मस्क यांच्याविरोधात जोरदार निदर्शने करत नागरिकांनी या दोघांच्याही हकालपट्टीची मागणी केली आहे. दरम्यान, ‘व्हाइट हाऊस’ ने सामाजिक सुरक्षा, आरोग्य सेवा याबाबतीत जनतेला पूर्ण सहकार्य करणार एक निवेदन प्रसिद्ध करत असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
जानेवारीपासूनच डोनाल्ड ट्रम्प यांनी शेकडो अध्यादेश काढत निर्णय जाहीर केले आहे. या संघटनांमध्ये नागरी हक्क संघटना, कामगार संघटना, एलजीबीटीक्यू समर्थक, माजी सैनिक आणि निवडणूक कार्यकर्ते यांचे गट सहभागी होते. “आम्ही आज येथे ट्रम्प प्रशासनाच्या धोरणांविरुद्ध निषेध करण्यासाठी येथे आलो आहोत, जे त्यांच्या धोरणामुळे अनेकांच्या भावना दुखवत आहेत. लोकशाहीला धोका निर्माण करत आहेत,” असे एका निदर्शकाने सांगितले. ट्रम्प प्रशासनाला त्यांच्या धोरणांसाठी व्यापक टीकेला सामोरे जावे लागले आहे.