बिहार: बिहारच्या भागलपुरमधुन गोळीबाराची घटना समोर आली आहे. येथे झालेल्या गोळीबारात केंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय यांच्या भाच्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. कौटुंबिक वादातून झालेल्या गोळीबारात मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. नवगछियाच्या जगतपुर भागात ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन भावांमध्ये क्षुल्लक कारणावरून गोळीबाराची ही घटना घडली. विश्वजित असं मृताचं नाव आहे. तर जयजीत आणि त्याची आई मीना जखमी झाले आहेत. दोघांमध्ये नळाच्या पाण्यावरुन भांडण झालं. त्यानंतर दोघांमध्ये हाणामारी झाली. रंगातून जयजीतने गोळीबार केला. यात विश्वजित गंभीर जखमी झाला. विश्वजीतचा रुग्णालयात नेत असतानाच मृत्यू झाला. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.








