Shocking News : पुणे : उत्तराखंड येथील चमोली भागात अलकनंदा नदीजवळ ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत वीजेचा धक्का लागून तब्बल १० जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.
उत्तराखंड येथील चमोली भागातील दुर्घटना
या घटनेबाबत माहिती देताना चमोली येथील डीएसपी प्रमोद साहा म्हणाले की, अलकनंदा नदीजवळ हा स्फोट झाल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात विद्युत प्रवाह उतरला. अपघाताच्या ठिकाणी लोखंडी कुंपण आहे. या कुंपणामध्ये करंट उतरल्यामुळे अनेकांना वीजेचा धक्का बसला. यातच त्यांचा मृत्यू झाला. (Shocking News) याच परिसरात ‘नमामि गंगे; या प्रकल्पाअंतर्गत काम सुरू होते. त्याठिकाणचा विद्युत प्रवाह पसरला आणि काही लोकांचा मृत्यू झाला, असेही सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेत एक पोलीस कर्मचारी व दोन होमगार्डही जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. मृतांमध्ये पिपळकोटीच्या आऊट पोस्ट इन्चार्जचाही समावेश आहे. (Shocking News) पिपळकोटी चौकीचे प्रभारी प्रदीप रावत आणि होमगार्ड मुकंदीलाल यांचाही या अपघातामध्ये समावेश आहे. अपघातातील मृतांचा आकडा वाढू शकतो, असे सांगितले जात आहे. घटनास्थळी बचाव व मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.
याबाबत स्थानिक आमदाराने दिलेल्या माहितीनुसार, प्रकल्पाच्या साइटवर आज सकाळी विजेचा तिसरा फेस डाऊन झाला होता. हा फेस टाकताना करंट पसरला. यामुळे एकजण मृत्यूमुखी पडला. नदीच्या काठावर त्याचा मृतदेह होता. मृतदेह पाहण्यासाठी काही लोक त्याठिकाणी गेले. त्यांनाही विजेचा धक्का बसला. नदीच्या काठावर नमामि गंगे प्रकल्पांतर्गत काम सुरू आहे. येथील अनेक मजूरही विजेच्या धक्क्याने जखमी झाले आहेत. या प्रकरणी वीज महामंडळावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. जिल्हा प्रशासन आणि एसडीआरएफची पथके मदत कार्यासाठी उपस्थित आहेत. जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी हेलिकॉप्टरही पाठवण्यात आले आहे. घटनास्थळी सर्व प्रकारची मदत पोहोचली आहे.
चमोलीच्या ऊर्जा महामंडळाचे कार्यकारी अभियंता अमित सक्सेना यांनी सांगितले की, काल रात्री तिसऱ्या टप्प्यातील वीज खंडित झाली होती. बुधवारी सकाळी तिसरा टप्पा जोडण्यात आला, (Shocking News) त्यानंतर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या आवारात विद्युत प्रवाह सुरू झाला. एलटी आणि एसटीच्या तारा ट्रान्सफॉर्मरपासून ते मीटरपर्यंत कुठेही तुटलेल्या नाहीत, मीटरनंतर तारांमध्ये विद्युत प्रवाह सुरू आहे. प्रकल्पाच्या साइटवर आज सकाळी विजेचा तिसरा फेस डाऊन झाला होता. हा फेस टाकताना करंट पसरल्याने ही दुर्घटना घडली आहे.
दरम्यान, या घटनेबाबत कोणालाही कल्पना नव्हती. रात्री येथे राहणाऱ्या केअरटेकरचा फोन लागत नसल्याचे नातेवाईकांनी घटनास्थळी येऊन शोधाशोध केली. त्यावेळी केअरटेकरचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. कुटुंबीयांसह अनेक ग्रामस्थही घटनास्थळी पोहोचले.(Shocking News) येथे पोहोचल्यावर पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. यादरम्यान पुन्हा विद्युत प्रवाह तेथे पसरला. यांच्या संपर्कात अनेकजण आले.
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी विजेच्या धक्क्याने झालेल्या मृत्यूच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सोबतच या घटनेची सखोल चौकशी करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. (Shocking News) त्यांनी डीएम चमोली यांच्याकडून घटनेची माहिती घेतली. जखमींना डेहराडूनला आणले जात असल्याचे सांगितले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shocking News : धक्कादायक! वाळू माफियांनी पोलिसाला ट्रॅक्टरखाली चिरडलं; पोलिसाचा जागीच मृत्यू
Shocking News : लग्न समारंभावरून परत येताना बोट उलटून १०० जणांचा मृत्यू; नायजेरिया देशातील घटना
Shocking News : सामुहिक बलात्काराने पुणे हादरले! अल्पवयीन मुलीवर तिघांनी आळीपाळीने केला बलात्कार