Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तिरुवनंतपुरममध्ये शशी थरूर यांचा सामना होणार भाजपचे राजीव चंद्रशेखर यांच्याशी, जाणून घ्या ‘या’ जागेवर गेल्या वेळी कशी होती लढत

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Friday, 8 March 2024, 22:43
Shashi Tharoor Will Face Rajeev Chandrashekhar In Kerala

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीची उत्सुकता आणखी वाढली आहे. भाजपपाठोपाठ आता काँग्रेसनेही लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात 39 उमेदवारांची नावे आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांना तिरुअनंतपुरममधून उमेदवारी देण्यात आली आहे. येथे भाजपने आधीच केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांना उमेदवारी दिली आहे. अशा स्थितीत तिरुवनंतपुरम जागेसाठीची लढत रंजक बनली आहे. 

 

शुक्रवारी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या नावाचाही समावेश आहे. थरूर यांना केरळमधील तिरुवनंतपुरममधून पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. यानंतर थरूर म्हणाले, ‘काँग्रेस पक्षाने मला ही संधी दिली याचा मला सन्मान वाटतो. मला 15 वर्षे तिरुवनंतपुरमची सेवा करण्याचा बहुमान मिळाला आहे आणि आणखी एका संधीची वाट पाहत आहे… मी निष्पक्ष स्पर्धेची वाट पाहत आहे.’ यापूर्वी 2 मार्च रोजी भाजपच्या पहिल्या यादीत 195 नावे जाहीर करण्यात आली होती. त्यात 34 केंद्रीय आणि राज्य मंत्र्यांची नावे होती. पहिल्या यादीत केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांना तिरुवनंतपुरममधून तिकीट देण्यात आले आहे.

तिरुवनंतपुरममधील 2019 चा निकाल कसा लागला? 
2019 मध्ये माजी परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री शशी थरूर यांनी काँग्रेसच्या तिकिटावर ही जागा जिंकली होती. या निवडणुकीत त्यांना 4,16,131 मते मिळाली. थरूर यांना एकूण 41.15% लोकांची मते मिळाली. गेल्या वेळी भाजप या जागेवर दुसऱ्या क्रमांकावर होता. पक्षाचे उमेदवार कुम्मनम राजशेखरन यांना 3,16,142 म्हणजेच 31.26% मते मिळाली. अशाप्रकारे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते शशी थरूर यांनी 99,989 मतांनी विजय मिळवला.

राजीव चंद्रशेखर बद्दल
राजीव हे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि जलशक्ती मंत्रालयाचे राज्यमंत्री आहेत. ते भाजपचे राज्यसभा खासदार, उद्योजक आणि टेक्नोक्रॅट आहेत. राजीव हे एप्रिल 2006 ते एप्रिल 2018 पर्यंत कर्नाटकमधून राज्यसभेचे सदस्य होते. एप्रिल 2018 मध्ये ते भाजपचे सदस्य म्हणून तिसऱ्या सहा वर्षांच्या कालावधीसाठी कर्नाटकमधून राज्यसभेवर पुन्हा निवडून आले

शशी थरूर यांच्याबद्दल
शशी थरूर हे सध्या तिरुवनंतपुरम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. ते तिसऱ्यांदा लोकसभेचे खासदार आहेत. त्यांनी यापूर्वी केंद्र सरकारमध्ये मनुष्यबळ विकास राज्यमंत्री आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. थरूर यांची संयुक्त राष्ट्रात जवळपास तीन दशकांची कारकीर्द होती. कोफी अन्नान यांच्या नेतृत्वात त्यांनी अंडर-सेक्रेटरी-जनरल म्हणून काम केले.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

सायबर चोरट्यांना आरबीआयचा दणका! 10 हजारांच्या व्यवहारासाठी आता १ तास थांबवावं लागणार; फसवणूक रोखण्यासाठी “नवे नियम”

Friday, 10 April 2026, 23:00

इराणमधील युद्धविरामानंतर मोठा दिलासा! एलपीजी सिलेंडरचा पुरवठा सुरळीत; मंत्रालयाने दिला टंचाईच्या अफवांना पूर्णविराम

Friday, 10 April 2026, 22:14

‘नाहीतर मी मोदींवर हल्ला करेन; तरुणाचा सीआयएला धमकीचा मेसेज; 22 दिवसांचा कालावधी दिला अन् बक्कळ पैशांची मागणी

Friday, 10 April 2026, 21:37

‘पाच हजार दे नाहीतर’ ट्रकचालकासोबत पोलिसांची बाचाबाची; ड्रॉयव्हरला मारहाण करत चक्क ट्रक पेटवला…

Friday, 10 April 2026, 20:59

महाराष्ट्रात रिक्षा चालवायची असेल तर मराठी आलंच पाहिजे! 1 मेपासून नवा नियम लागू; नियम मोडल्यास थेट परवाना रद्द!

Friday, 10 April 2026, 20:26
RR vs RCB

RR vs RCB : पावसामुळे आयपीएलचा थरार थांबला! बारसापारा स्टेडियमवर कव्हर्सची एन्ट्री; सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता

Friday, 10 April 2026, 19:48
Next Post
Mahayuti meeting in delhi on HM amit shah residence

महायुतीच्या जागा वाटपावर अमित शाह यांच्या बंगल्यावर होणार खल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.