नवी दिल्ली: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता दिरंगाई प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. आजही सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांचं वेळापत्रक फेटाळलं आहे. तसेच, अत्यंत कठोर शब्दांत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सादर केलेल्या नव्या वेळापत्रकावरही सुप्रीम कोर्टाने आजच्या सुनावणीत नाराजी व्यक्त केली. तसेच, 31 डिसेंबरपर्यंत अंतिम निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दिले आहेत.