पहलगाम: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीर येथील नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी दहशतवादी हल्ला केला, ज्यामध्ये २८ निष्पाप नागरिकांचा बळी आणि १३ जण जखमी झाले. या भ्याड हल्ल्याचा अनेकांनी निषेध केला आहे. पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी भारतीय आणि परदेशी पर्यटकांवर गोळीबार केला आहे. हा हल्ला ८-१० दहशतवाद्यांनी केल्याचे मानले जाते, त्यापैकी ५-७ जण पाकिस्तानचे असून दहशतवाद्यांना हल्ल्यासाठी स्थानिक नागरिकांनी पोलिसाचे वेश धारण करून केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. स्थानिकांनी रेकी करून मदत केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी श्रीनगरला भेट दिली आणि अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी ‘द रेजिस्टन्स फ्रंट’ (TRF) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती. TRF चे मुख्यालय पाकिस्तानमध्ये असून, ‘द रेजिस्टन्स फ्रंट’ हा लष्कर-ए-तोयबाचा प्रॉक्सी गट मानला जातो. दहशतवादी हाफिज सईदचा उजवा हात मानला जाणारा सज्जाद गुल हा द रेजिस्टन्स फ्रंटचा सूत्रधार असून त्याच्या सांगण्यावरून हा हल्ला घडवण्यात आला आहे. सज्जाद गुल हा TRF च्या सर्व ऑपरेशन्सचा मुख्य नियोजक मानला जातो, सज्जाद गुल या दहशतवाद्याला पकडण्यासाठी भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी त्याच्यावर अनेक इनाम जाहीर केल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणा अनेक वर्षांपासून सज्जाद गुलचा शोध घेत आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर असून दहशतवाद्यांना पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू आहे. हल्ल्यानंतर अनेक पर्यटकांनी त्यांच्या सुरक्षिततेच्या भीतीने काश्मीरमधून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे.
द रेजिस्टन्स फ्रंट हि संघटना कलम ३७० रद्द केल्यापासून सक्रीय झाली असून आणि ते त्यांच्या विचारसरणीचा प्रसार करण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करत असून काश्मीर येथील नागरिकांचे मत परिवर्तन करून त्यांना संघटनेमध्ये सामील करून घेत आहेत. टीआरएफला पाकिस्तानचे सैन्य आणि आयएसआयकडून निधी मिळत असल्याचे मानले जाते आणि काश्मीर खोऱ्यात अशांतता निर्माण करून हल्ले करणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. पहलगाम हल्ल्याची जबाबदारी या गटाने घेतल्याने या प्रदेशातील सुरक्षा परिस्थितीबद्दल चिंता निर्माण झाली आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा दलांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे आणि दहशतवाद्यांना पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू आहे. सरकारने आश्वासन दिले आहे की, या प्रदेशातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जातील.