Haryana Political Crisis : लोकसभा निवडणुकीपूर्वी हरियाणामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. हरियाणामध्ये भाजप-जननायक जनता पक्षाची युती तुटली आहे. चंदीगडमध्ये भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आपल्या मंत्रिमंडळासह राजभवनात पोहोचले आणि त्यांनी संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. आता दुपारी एक वाजता शपथविधी होणार असून नायबसिंह सैनी नवे मुख्यमंत्री होऊ शकतात, अशी माहिती समोर आली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत जागावाटपावरून मतभेद झाल्याने ही युती तुटत असल्याची माहिती आहे. त्यामुळे हरियाणाच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार असून आजच नव्या मंत्रीमंडळाची स्थापना होणार आहे.
नव्या मुख्यमंत्र्यांचा आजच शपथविधी?
भाजपचे पर्यवेक्षक म्हणून अर्जुन मुंडा आणि तरूण चुघ हरियाणामध्ये दाखल झाले आहेत. हरियाणात भाजप संजय भाटिया यांना मुख्यमंत्री आणि नायब सैनी यांना उपमुख्यमंत्री बनवू शकते. मनोहर लाल खट्टर कर्नालमधून लोकसभा निवडणूक लढवू शकतात.
हरियाणा विधानसभेचे असे आहे पक्षीय बलाबल?
हरियाणामध्ये विधानसभेच्या 90 जागा असून सध्या 90 जागांपैकी भाजपकडे 41, काँग्रेसकडे 30, आयएनएलडीकडे 10, एचएलपीकडे एक आणि सात अपक्ष आहेत. हरियाणात 46 आमदारांची गरज आहे. अशा स्थितीत हरियाणात गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ४१ जागा मिळाल्या होत्या, तेव्हा त्यांनी जेजेपीच्या १० आमदारांना सोबत घेऊन सरकार स्थापन केले होते. जेजेपीसोबत युती केल्यानंतर दुष्यंत चौटाला यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले होते.