नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरी सर्वच पक्षांनी निवडणुकीची पूर्ण तयारी केली आहे. यावेळीही भाजपच्या लोकसभा निवडणुकीची कमान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हाती असेल. 25 मार्चनंतर पंतप्रधान मोदी देशभरात जोरदार प्रचार करणार आहेत. मोदी हे देशभरात सुमारे 150 निवडणूक सभा आणि रोड शो करणार आहेत, तर दक्षिण भारतात 35 ते 40 निवडणूक सभा घेणार आहेत. पीएम मोदी यूपीमध्ये 15 हून अधिक रॅली आणि रोड शो करणार आहेत.