PM Flies In Tejas: बेंगळुरू: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेंगळुरूमध्ये तेजस या लढाऊ विमानातून उड्डाण केले. त्यांनी शनिवारी (25 नोव्हेंबर 2023) बेंगळुरू येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) च्या सुविधेला भेट दिली. पीएमओच्या म्हणण्यानुसार ते तेजस जेटच्या मॅन्युफॅक्चरिंग हबची पाहणी करण्यासाठी आले होते.
मोदी सरकार संरक्षण उत्पादनांच्या स्वदेशी उत्पादनावर भर देत आहे. आपल्या सरकारने भारतात संरक्षण उपकरणांच्या निर्मिती आणि निर्यातीला कशाप्रकारे प्रोत्साहन दिले आहे हे त्यांनी अनेकदा अधोरेखित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले भारतीय वायुसेना, DRDO आणि HAL तसेच सर्व भारतीयांचे मनःपूर्वक अभिनंदन.
#WATCH | Prime Minister Narendra Modi flew a sortie on Tejas aircraft in Bengaluru, Karnataka, earlier today. pic.twitter.com/TNtWyHHDu9
— ANI (@ANI) November 25, 2023