Petrol Diesel Price in Maharashtra : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत आज घसरण झाली आहे. आज सकाळी सहा वाजता WTI क्रूड प्रति बॅरल $ ७२.६६ वर तर ब्रेंट क्रूड प्रति बॅरल ७८.१५ वर व्यवहार करत आहे.
देशातील तेल विपणन कंपन्यांकडून पेट्रोल – डिझेलचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. भारतात रोज सकाळी ६ वाजता इंधनाचे दर सुधारले जातात. मिळालेल्या अधिक माहितीनुसार २०२४ च्या निवडणूकांपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत बदल होऊ शकतात असे केंद्र सरकारने सांगितले होते. मात्र, अद्याप यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. अशातच आज महाराष्ट्र राज्यात पेट्रोल-डिझेलचा भाव घसरला आहे.
हिमाचल प्रदेशात पेट्रोल २६ पैशांनी तर डिझेल २५ पैशांनी महागले आहे. गोवा, केरळ आणि तेलंगणामध्ये पेट्रोल आणि डिझेल महाग झाले आहे. महाराष्ट्रात पेट्रोल ५० पैशांनी तर डिझेल ४६ पैशांनी स्वस्त झालं आहे. चला तर मग जाणून घेऊया महानगर आणि राज्यातील आजचे दर
चार महानगरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर
- दिल्लीत पेट्रोल ९६.२७ रुपये आणि डिझेल ९०.८० रुपये प्रति लिटर
- मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर
- कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर
- चेन्नईमध्ये पेट्रोल ०६.३१ रुपये. आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर
महाराष्ट्रातील इतर शहरांचा पेट्रोल-डिझेलचे भाव
- पुणे-पेट्रोल १०६.०१ रुपये आणि डिझेल ९२.५३ रुपये प्रति लिटर
- ठाणे-पेट्रोल रुपये१०५.९७ आणि डिझेल ९२.४७ रुपये प्रति लिटर
- नाशिक-पेट्रोल १०६.७७ रुपये आणि डिझेल ९३.२७ रुपये प्रति लिटर
- नागपूर-पेट्रोल १०६.२७ रुपये आणि डिझेल ९२.८१ रुपये प्रति लिटर
- कोल्हापूर-पेट्रोल १०६.४७ रुपये आणि डिझेल ९३.०१ रुपये प्रति लिटर