लहू चव्हाण
National Honor Award | पाचगणी : पाचगणी शहरातील विकासकामांसह नागरी सुविधा गतिमान करणारे पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदचे मुख्याधिकारी तथा प्रशासक गिरीश दापकेकर यांना विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह, विशेष प्रमाणपत्र, म्हैसूरी फेटा, चंदनाचा कायमस्वरूपी हार असा राष्ट्रीय गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
गोवा येथील गणपत पार्सेकर कॉलेज ऑफ एज्युकेशन हरमल येथे काल हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. यावेळीमा. केंद्रीय कायदा मंत्री व कर्नाटकचे मा. मुख्यमंत्री वीरप्पा मोइली, गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, कोल्हापूर महानगरपालिकेचे महापौर राजू शिंगाडे, फाऊंडेशन चेअरमन कीमेल शर्मा, बेळगावचे खासदार बॅरिस्टर अमरसिंह पाटील, विशेष अभियंता जयराज लोढे, केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर, जिल्हा कमांडेंट होगा डिपार्टमेंट कर्नाटक सरकार अरविंद पट्टी, बिदरचे जिल्हा पोलिस प्रमुख महेश मेघाण्णावर आदींच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा पार पडला.
गिरीश दापकेकर यांनी कोरोना काळात शहरातील प्रत्येक घरोघरी जाऊन आरोग्याची त्रिसूत्री मोहीम यशस्वीपणे राबविल्याबद्दल त्याचबरोबर दापकेकर यांच्या प्रशासकीय गणिमानतेची दखल घेवून त्यांना हा राष्ट्रीय पुरस्कार बहाल करण्यात आला आहे.
या पुरस्काराबद्दल त्यांचे जननायक आमदार मकरंद आबा पाटील, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, पालिका कर्मचारी आदी बरोबरच राजकीय, सामाजिक, क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
National Honor Award | शेखर कासुर्डे यांना राष्ट्रीय गौरव पुरस्काराने गौरविले
Pune News | सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ज्ञानोबा-तुकाराम पुरस्काराचे वितरण
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गायिका सावनी रविंद्रने घेतली सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल यांची भेट