PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली असून मोदी केवळ देशातच नाही तर जगभरात लोकप्रिय नेते ठरले आहेत. मॉर्निंग कंसल्टने केलेल्या सर्वेक्षणात मोदी पुन्हा एकदा जागतिक लोकप्रिय नेत्यांमध्ये शीर्षस्थानी आले असून पीएम मोदींना सर्वाधिक ७६ टक्के इतके रेटिंग मिळाले आहे. (PM Narendra Modi)
तर 18 टक्के लोकांना त्यांचे नेतृत्व आवडत नसल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. तर सहा टक्के लोकांनी यावर कोणतेही मत दिले नाही. या सर्व्हेत इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मॅलोनी सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांना ४१ टक्के रेटिंग मिळालं आहे.
तर, दुसरीकडे अध्यक्ष जो बायडेन लोकप्रिय नेत्यांच्या यादीत आठव्या क्रमांकावर आहेत. बायडेन यांना ३७ टक्के रेटिंग मिळाली असून मॉर्निंग कंसल्टने २९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत सर्व्हे करून डेटाच्या आधारे ही माहिती दिली आहे. महत्वाची बाब म्हणजे, पंतप्रधान मोदी यांचे डिसअप्रूव्हल रेटिंगही इतर नेत्यांच्या तुलनेत कमी आहे. ही तमाम भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे.
रेटिंगच्या बाबतीत पंतप्रधान मोदींच्या जवळही कोणी नसल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. नरेंद्र मोदी नंतर मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर हे सर्वेक्षणात दुसऱ्या स्थानावर आहेत, त्यांना ६६ टक्के रेटिंग मिळाले आहे. तसेच तिसर्या क्रमांकावर स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष अलेन बेरसेट यांना 58 टक्के रेटिंग मिळाली आहे. मागील सर्वेक्षणांमध्ये ही पंतप्रधान मोदी हे जागतिक रेटिंगमध्ये अव्वल स्थानावर होते.(Narendra Modi)
अशी काढली जाते रेटिंग?
जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांची यादी वेगवेगळ्या देशांतील प्रौढ लोकसंख्येच्या रेटिंगच्या आधारे काढली जाते. तसेच, प्रत्येक देशातील सॅम्पल साईज वेगळी असते. मॉर्निंग कंसल्ट ही संस्था प्रत्येक आठवड्यात लोकप्रिय नेत्यांची रेटिंग जाहीर करत असते. या रेटिंगमध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने अव्वल स्थानावर आहेत.