सध्या वातावरणात कमालीचे बदल पहायला मिळत आहेत. पावसाळा, हिवाळा गायब झाला असून जणू काही फक्त उन्हाळा हा एकमेव ऋुतू राहिल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. अमेरिकन संशोधकांच्या म्हणण्यानुसार, वाढत्या तापमानामुळे पृथ्वीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. 2050 वर्ष हे भारतासाठी धोकादायक ठरणार आहे. किंबहूना 2050च्या त्याआधीच भारतातील दोन मोठी शहरे समुद्रात बुडणार असल्याची भिती अमेरिकन संशोधकांनी व्यक्त केली आहे.
क्लायमेट सेंट्रल या अमेरिकन संस्थेने 2019 मध्ये क्लायमेट चेंजबाबत मोठा दावा केला होता. भारतातील मुंबई आणि कोलकाता पूर्णपणे समुद्रात बुडणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्याशिवाय सुरत, ओडिशा, केरळ, तामिळनाडू या शहरांचा धोकादायक यादीत समावेश आहे. भारतासह जगभारतील अनेक देश देखील पाण्याखाली जातील अशी भिती संशोधकांनी व्यक्त केली आहे. समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या 10 देशांच्या लोकसंख्येवर याचा प्रभाव होणार आहे. सर्वाधिक प्रभावित देशांच्या यादीत भारत अव्वल स्थानी आहे.
भारतातील मुंबई आणि कोलकाता शहराला मोठा धोका
2050 मध्ये निसर्गाचा मोठा प्रकोप होणार आहे. वातावरणातील बदलामुळे पृथ्वीवरील तापमानात कमालीचे बदल होत आहेत. हिमनद्या वितळू लागल्या आहेत. मान्सूवर देखील याचा परिणाण पहायला मिळत आहे. मान्सूनचे वेळापत्रक बदलले आहे. कधी पूर येतो तर कुठे दुष्काळ पडतोय. जलदगतीने होणारे शहरीकरण यामुळे मुंबई आणि कोलकाता येथील किनारपट्टीलगत राहणाऱ्या लोकांना पुराचा सर्वाधिक धोका असल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे.
5 शहरी आधीच बुडाली
हवामान बदलामुळे आतापर्यंत जगातील पाच शहरे समुद्राच्या पाण्यात पूर्णपणे बुडाली आहेत. या शहरांमध्ये मोठ्या लोकसंख्येने लोक राहात होते. इजिप्तमधील थॉनिस हेराक्लियन शहर, इटलीचे बाया शहर, इंग्लंडमधील डरवेंट गाव, जमैकाचे पोर्ट रॉयल आणि अर्जेंटिनामधील विला अपेक्युएन क्षेत्र ही पाच शहरे समुद्रात बुडाली आहेत.