Jaypur Crime: जयपूरमधून अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. येथे घरी आलेल्या नातेवाइकाने 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आरोपिला पोलिसांनी अटक केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, 14 वर्षीय पीडित मुलगी आणि तिचे कुटुंबय हे मूळचे हरियाणाचे आहेत. ते जयपूरमध्ये भाड्याने घर घेऊन राहत होते. या अल्वपवयीन मुलीचे वडील मजूर म्हणून काम करतात.
नेमकं काय घडलं?
बुधवारी (5 नोव्हेंबर) रोजी रात्री पीडित अल्पवयीन मुलगी तिच्या आई आणि दोन लहान बहिणींसोबत एका खोलीत झोपली होती. तेंव्हा कुटुंबातीलच एक तरुण खोलीत आला. त्याने तिला उठवून घराच्या छतावर घेवून गेला. त्यानंतर त्याने पिडीतेसोबात तिचे तोंड दाबून बळजबरीने अत्याचार केला.
दरम्यान, पिडीत मुलगी मोठमोठ्याने ओरडू लागल्याने शेजारच्यांना जग आली. त्यानंतर घरातलेही जागे झाले. घरातले आवाजाच्या दिशेने गेले असता गच्चीवर आरोपी नराधम मुलीवर अत्याचार करताना आढळून आला. त्यानंतर मुलीच्या वडिलांसह शेजाऱ्यांनी आरोपीला चांगलाच चोप दिला.
त्यांनंतर पीडित मुलीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी आरोपी नराधमाविरूद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याच्याविरुध्द बलात्कार आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा: एका रात्रीत सगळं संपलं! मद्यपान केलं, मित्र हॉटेलमध्ये सोडून गेला अन् सकाळी मृत्यू; नेमकं काय घडलं?







