उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील फारुखाबादमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे, जिथे पप्पू नावाच्या एका व्यक्तीने त्यांच्या पत्नीचे लग्न तिच्यापेक्षा वयाने खूपच लहान असलेल्या प्रियकराशी लावून दिले आहे. या असामान्य घटनेने काही ग्रामीण भागात, विशेषतः समाजातील मध्यमवर्गीय घटकांमध्ये हा ट्रेंड बनत चालला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पप्पूची पत्नी तिच्यापेक्षा वयाने खूपच लहान आणि बेरोजगार असलेल्या स्थानिक तरुणासोबत प्रेमसंबंधात होती. दोन मुलांची आई असलेली ही महिला काही काळापासून गुप्तपणे तिच्या प्रियकराला भेटत होती. सामाजिक दबाव आणि टोमण्यांना कंटाळून, पप्पूने बाजूला होण्याचा आणि आपल्या पत्नीचे लग्न तिच्या प्रियकराशी करण्याचा निर्णय घेतला. पतीने मी मुलांना सांभाळून घेऊल तु करून घे लग्न असे म्हणत, पत्नीचे लग्न लावून दिले आहे.
१० एप्रिल रोजी या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये पप्पू आणि इतर कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत लग्न समारंभ होत असल्याचे दाखवण्यात आले होते. या व्हिडिओमुळे समाजात व्यापक चर्चा सुरू झाली आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागातील सामाजिक रूढी आणि मूल्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. काहींनी पप्पूच्या धाडसी निर्णयाचे कौतुक केले आहे.