मुंबई : जगात अशा काही घटना घडत असतात तेव्हा ऐकावं ते नवलच असं वाटत असतं. अशाच प्रकारचा अनुभव यावा असा एक प्रकार समोर आला आहे. ज्याची सद्या सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली आहे. हॉटेलच्या लॉबीमध्ये लघवी केली म्हणून एका सेल्समॅनला कामावरुन काढलं गेलं, पण नंतर त्याने उलट आपल्या कंपनीवरच केस केली आणि कोट्यवधींची मागणी केली केल्याचा प्रकार समोर आला आहे. इतकंच नाही तर त्यांनेच कंपनीविरोधात गुन्हाही दाखल केला आहे. हे वाचून कुणालाही आश्चर्य वाटेल कि नेमकं काय झालं असेल? तर जाणून घेऊ नेमकं प्रकरण काय?
हे प्रकरण अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील असून 66 वर्षीय रिचर्ड बेकर यांनी न्यायालयात दावा दाखल केला. या दाव्यात त्याने म्हटले आहे की, त्याला चुकीच्या पद्धतीने नोकरीवरून काढण्यात आले आहे. आता त्याने कंपनीकडे किमान 1.5 दशलक्ष डॉलर्स (12 कोटी) नुकसान भरपाईची मागणी केली आहे. रिचर्ड बेकरवर टाइम्स स्क्वेअर हॉटेलमध्ये लघवी केल्याचा आरोप त्याच्या एका सहकाऱ्याने त्याच्यावर लावला आहे. त्याने याची तक्रार HR कडे केली, की तो मुद्दाम हॉटेलच्या लॉबीमध्ये लघवी करत आहे. पुढे रिचर्ड यांनी सांगितलं की, तो लघवीशी संबंधित आजाराने त्रस्त असून कंपनीला याची माहिती आहे.
रिचर्डने सांगितले की, तो रात्रीचे जेवण करून हॉटेलमध्ये परतत असताना त्याला लघवी आली. तो टॉयलेटपर्यंत पोहोचू शकला नाही आणि लॉबीला लागून असलेल्या व्हरांड्यात त्याने लघवी केली. 2016 पासून तो या आजाराने त्रस्त असल्याचे त्याने सांगितले. त्यावर उपचारही सुरू आहेत. कंपनीशी संबंधित लोकांना याची माहिती होती, पण सहानुभूती दाखवण्याऐवजी त्यांना कंपनीतून काढून टाकण्यात आले. जे चुकीचे आहे.
त्यामुळे रिचर्ड यांनी आता कंपनीवर मानवी हक्क कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप करत खटला दाखल केला असून सुमारे 12 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली आहे. मात्र कंपनीकडून याबाबत कोणतेही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.