Independence Day 2024 : आपल्या माता, बहिणी आणि मुलींवर होत असलेल्या अत्याचारांचा समाज म्हणून विचार करायला हवा. राज्य सरकारांना याचा गांभीर्याने विचार करावा लागेल. महिलांवर अत्याचार करणा-या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा होऊन या शिक्षेचीही व्यापक चर्चा झालीच पाहिजे जेणेकरून या प्रवृत्तीच्या नराधमांच्या मनात भीती निर्माण होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
#WATCH | PM Narendra Modi says, “…I would like to express my pain once again, from the Red Fort today. As a society, we will have to think seriously about the atrocities against women that are happening – there is outrage against this in the country. I can feel this outrage.… pic.twitter.com/2gQ53VrsGk
— ANI (@ANI) August 15, 2024
आज स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहण केले. त्यानंतर देशाला संबोधित करताना बोलत होते.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “बांग्लादेशात जे काही झाल आहे. त्याबद्दल चिंता आहे. मी आशा करतो, तिथे परिस्थिती सामान्य होईल. खासकरुन 140 कोटी देशवासियांना चिंता आहे. बांग्लादेशात हिंदू, अल्पसंख्याक समुदायाची सुरक्षा सुनिश्चित झाली पाहिजे. शेजारी देशात सुख, शांती नांदावी हीच नेहमी भारताची भूमिका राहिली आहे. त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमचे तसे संस्कार आहोत. बांग्लादेशाच्या विकास यात्रेत आमच शुभचिंतन राहील”.
तसेच भारताने 2036 मध्ये ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करावे असे म्हणत आपण त्यासाठीची तयारीसुद्धा सुरू केल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधीत्वं करत विजयी कामगिर करणाऱ्या खेळाडूंचं कौतुक केलं. भारताच्या गटात सहभागी असणाऱ्या प्रत्येक खेळाडूच्या पाठीवर पंतप्रधनांनी शाबासकीची थाप दिली.