Gautam Adani : नवी दिल्ली : गौतम अदानी यांच्याबाबात एक मोठी बातमी समोर आली आहे. लवकरत गौतम अदानी श्रीलंकेत बंदर टर्मिनल बांधणार आहेत. आर्श्चकारकबाब म्हणजे स्वत: आपला देश त्यांना यासाठी मदत करणार नाहीये तर अमेरिका गौतम अदानी यांना बंदर टर्मिनल बांधण्यासाठी आर्थिक मदत करणार आहे. चिन सर्वच क्षेत्रात अमेरिकेच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे सध्या अमेरिका आणि चिन यांच्यात कोल्डवार सुरू आहे. चीनचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी अप्रत्यक्ष प्रकारे अमेरिकेकडून खेळी खेळली जातेय. चीनने गेल्या वर्षी श्रीलंकेत 2.2 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली होती.
श्रीलंकेतील चीनचा प्रभाव कमी करण्यासाठी अमेरिकेने अदानी समूहासोबत करार करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे बंदर टर्मिनल बांधण्यासाठी गौतम अदानी यांना 553 दशलक्ष डॉलर्सची रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने जगभरातील पायाभूत सुविधांमध्ये केलेली ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. अमेरिकेच्या डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनचे म्हणणे आहे की यामुळे श्रीलंकेतील आर्थिक व्यवहारांना चालना मिळण्यास मदत होईल. त्यामुळे भारत आणि श्रीलंका यांच्यात अधिक चांगला समन्वय साधणे शक्य होणार आहे. श्रीलंकेतील बंदर विकसित करण्यासाठी गौतम अदानी यांना दिलेला हा निधी अलीकडच्या काळात श्रीलंकेतील चीनच्या वाढत्या प्रभावामुळे अमेरिका त्रस्त असल्याचेही सूचित आहे.
कोलंबोच्या वेस्ट कंटेनर टर्मिनलचा विकास करण्यासाठी गौतम अदानींना इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनकडून ही रक्कम मिळणार आहे. अमेरिकनने 2023 मध्ये आतापर्यंत 9.3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. श्रीलंकेतील ही सर्वात मोठी थेट विदेशी गुंतवणूक आहे.