झारखंड : झारखंडच्या जमशेदपूर येथे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक भीषण अपघात घडला आहे. नववर्षाची पार्टी करून घरी परतत असताना, आठ मित्रांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. जमशेदपूर येथील बिष्टूपूर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील सर्किट हाऊस परिसरात हा अपघात घडला आहे. या अपघात गाडीचा चक्का चूर झाला आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, भरधाव वेगात चाललेली गाडी पहिल्यांदा रस्त्याच्या दुभाजकाला जोरदार आदळली आणि त्यानंतर पुढे जाऊन झाडावर आदळून उलटली. या घटनेननंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. गाडीमध्ये बसलेले सहा युवक जागीच ठार झाले तर दोघांची प्रकृती चिंताजनक प्राथमिक माहिती आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले, गाडीतील मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी पाठवून दिले. तर जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृत युवक कुलुप्तांगा भागातील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे.
जमशेदपूरचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक कौशल किशोर यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, पाच जण बसण्याची क्षमता असलेल्या गाडीत आठ युवक बसले होते. गाडी पहिल्यांदा रस्त्याच्या दुभाजकाला आदळली आणि त्यानंतर पुढे असल्येल्या झाडावर फेकली गेली. गाडीतील पाच युवक जागीच ठार झाले, तर इतर तिघांना रुग्णालयात नेले असताना त्यापैकी एकाचा वाटेतच मृत्यू झाला. दोघांवर उपचार सुरू आहेत. गाडी अतिवेगात होती, असेही ते म्हणाले.
Jharkhand: 6 people died in a road accident in Jamshedpur after their car went uncontrolled and hit the divider. A total of 8 people, all residents of Adityapur, were there in the car at the time of the accident. Five died on the spot while one died during the treatment. Two…
— ANI (@ANI) January 1, 2024