नवी दिल्ली: भारताने ऑपरेशन सिंदूरच्यामाध्यमातून पाकिस्तानमधील दहशतवादी स्थळांवर हल्ले करून नेस्तनाबूत केल्यानंतर आता भारत पाकिस्तानच्या सीमेवर तणाव वाढला आहे. आता पाकिस्तानने जम्मूवर ड्रोन हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर संपूर्ण जम्मूमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आलं आहे. त्याच वेळी भारताची डिफेन्स सिस्टिम सक्रिय करण्यात आली आहे. जम्मूमधील विमानतळ हे पाकिस्तानचं लक्ष्य होतं अशी माहिती समोर येत आहे. भारताने पाकिस्तानचे जम्मू ड्रोन पाडल्याची माहिती समोर येत आहे.
पाकिस्तानने गुरुवारी रात्रीच्या वेळी भारताच्या हद्दीत जम्मू शहरात ड्रोनने हल्ला सुरू केला आहे. त्यानंतर संपूर्ण जम्मूमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आले आहे. त्यानंतर नागरिकांना सायरन वाजवून सावध करण्यात आलं आहे. दरम्यान, भारताने डिफेन्स सिस्टिम एस 400 सक्रिय केली असून हल्ला परतवून लावण्यात यश आलं आहे. भारताने केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे अनेक ड्रोन पाडण्यात आले आहेत.
यावेळी जम्मूमधील विमानतळ पाकिस्तानने लक्ष्य केलं होतं. तसेच जम्मू विद्यापीठही लक्ष्य केल्याची माहिती समोर येत आहे. त्याचवेळी राजस्थानमध्ये एक ड्रोन भारतीय हवाई दलानं पडल्याची माहिती समोर येत आहे. तर पंजाबच्या अमृतसर शहरातही ब्लॅक आऊट करण्यात आलं आहे.