पुणे प्राईम न्यूज : दिल्लीत आम आदमी पार्टच्या नेत्यांवर अंमलबजावणी संचालनालयाची कारवाई सुरूच आहे. याच क्रमाने ईडीने अमानतुल्ला खान यांच्या घरावर छापा टाकला आहे. खान यांच्यावर गेल्या वर्षी वक्फ बोर्डाच्या जमीन घोटाळ्याच्या आरोपांच्या आधारे ईडीने हा छापा टाकला आहे. गेल्या वर्षी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिल्लीतील खान यांच्याशी संबंधित 5 ठिकाणी छापे टाकले होते. या छाप्यात 12 लाखांची रोकड, 1 विनापरवाना बेरेटा पिस्तूल आणि 2 वेगवेगळ्या बोअरची काडतुसे जप्त करण्यात आली.
गेल्या वर्षी एसीबीने अमानतुल्ला खान यांना अटक केली होती आणि नंतर त्यांना जामीनही मिळाला होता. गेल्या वर्षी वक्फ बोर्ड प्रकरणात एसीबीच्या छाप्यादरम्यान आप आमदाराच्या जवळच्या ठिकाणांवरून सापडलेल्या डायरींबाबत ईडीचा हा छापा सुरू आहे. दिल्ली वक्फ बोर्डाच्या आर्थिक अनियमिततेप्रकरणी सीबीआय आणि एसीबीने स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.
हवालाद्वारे परदेशात पैसे पाठवले जात होते?
अमानतुल्ला खान यांना गेल्या वर्षी एसीबीने अटक केली होती. झडतीदरम्यान काही डायरी जप्त करण्यात आल्या. अमानतुल्ला खान यांच्या निकटवर्तीयाकडे ही डायरी सापडल्या. ज्यामध्ये हवाला व्यवहाराचे प्रकरण समोर आले. परदेशातूनही काही व्यवहार झाल्याचे सांगण्यात आले. एसीबीने त्याचा तपास ईडीकडे शेअर केला होता.
अमानतुल्ला खान यांच्यावर दिल्ली वक्फ बोर्डाचे अध्यक्ष असताना नियमांचे उल्लंघन करून ३२ जणांची भरती केल्याचा आरोप आहे. दिल्ली वक्फ बोर्डाचे अध्यक्ष असताना आपच्या आमदाराने भ्रष्टाचार आणि पक्षपात केल्याचा आरोप होता. याशिवाय दिल्ली वक्फ बोर्डाच्या अनेक मालमत्ता बेकायदेशीरपणे भाड्याने देण्यात आल्या होत्या. बोर्डाच्या पैशाचाही गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.
हेही वाचा:
Daund News : वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण, शिवीगाळ