नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी खिसेकापू म्हणून आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना गुरुवारी 21 डिसेंबरला दिल्ली उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. राहुल गांधी यांच्यावर आठ आठवड्यांत कारवाई करण्याबाबत त्वरित निर्णय घ्यावा, असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले आहेत. अशाप्रकारची वक्तव्ये करणे टाळले पाहिजे असं दिल्ली हायकोर्टाने म्हटलं आहे.
दिल्ली हायकोर्टाने निवडणूक आयोगाला आठ आठवड्यांत या प्रकरणी निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. राहुल गांधी यांनी प्रचारसभेमध्ये मोदी यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली होती. राजस्थानमध्ये निवडणूक रॅली काढताना पीएम मोदींवर पाकीटमार, पनौती मोदी अशी टीका केली होती. या वक्तव्यानंतर निवडणूक आयोगाने १९ नोव्हेंबर रोजी राहुल यांना नोटीस पाठविली होती.
या नोटिसीलाही त्यांनी उत्तर दिले नाही. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयात राहुल यांच्याविरोधात दाखल याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. न्यायालयाने अशाप्रकारच्या असभ्य वक्तव्याची भविष्यात पुनरावृत्ती थांबविण्यासाठी राहुल यांच्यावर कारवाई करण्याबाबत निर्णय घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले.
23 नोव्हेंबर रोजी पाठवलेल्या नोटीसमध्ये न्यायालयाने म्हटले होते की, निवडणूक आयोगानेच या प्रकरणी योग्य ती कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. याचिकाकर्ते भरत नागर यांनी उच्च न्यायालयाला सांगितले की, 22 नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांनी पंतप्रधानांसह सर्वोच्च सरकारी पदांवर असलेल्या व्यक्तींवर घृणास्पद आरोप करणारे भाषण करत राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना पाकीटमार असं म्हटलं होतं.
Delhi High Court says Congress MP Rahul Gandhi’s speech given on November 22 against Prime Minister Narendra Modi, calling him a ‘pickpocket’ was ‘not in good taste.
Delhi High Court directed the Election Commission of India to decide the matter within 8 weeks.
— ANI (@ANI) December 21, 2023