पुणे : महाराष्ट्रातील बडतर्फ प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकरला उच्च न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने अटकेपासूनचे अंतरिम संरक्षण 4 ऑक्टोबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. पूजा खेडकर यांच्या वकिलांनी तपशीलवार म्हणणे मांडण्यासाठी वेळ मागितल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाला स्थगिती दिली आहे.
पूजा खेडकर हिने बनावट कागदपत्रांच्या आधारे IAS ची नोकरी मिळवली असल्याचा आरोप झाल्यावर यूपीएसीने देखील याबाबत तपास केला असता, तिने परीक्षेसाठी विविध नावांचा वापर केल्याची माहिती समोर आली होती. तसेच केलेल्या तपासात पूजा खेडकर हीच दोषी आढळली. पूजा खेडकर यांनी नियमांचे उल्लघंन केल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती.
केंद्र सरकारने सात सप्टेंबर रोजी पूजा खेडकर यांना भारतीय प्रशासकीय सेवेतून कार्यमुक्त केले होते. आयएएस (प्रोबेशनरी) नियम 1954 च्या नियम 1954 च्या नियम 12 अन्वये त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती.
Delhi High Court extends the interim protection from arrest granted to former IAS officer Pooja Khedkar until October 4, 2024, which is the next scheduled hearing date.
The court adjourned the matter after the related counsels sought time to make detailed submissions.… pic.twitter.com/tXcTV30JLN
— ANI (@ANI) September 26, 2024