नवी दिल्ली : 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना ‘दादासाहेब फाळके जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विज्ञान भवनात 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरूगन, माहिती व प्रसारण विभागाचे सचिव संजय जाजू आणि पर्यवेक्षक समितीचे अध्यक्ष व मान्यवर उपस्थित होते. प्रदान झालेले पुरस्कार वर्ष 2022 चे आहेत.
तसेच ‘ममर्स ऑफ द जंगल’, ‘वारसा’, ‘या मराठी चित्रपटांनाही विविध श्रेणींमध्ये सन्मानित करण्यात आले. फिचर फिल्म श्रेणीत 38 पुरस्कार जाहीर झाले. यात विविध भाषेतील उत्कृष्ट चित्रपटांचाही समावेश आहे. तर नॉन फिचर फिल्ममध्ये विविध श्रेणीमध्ये 18 पुरस्कार जाहीर झाले.
मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार
मिथुन चक्रवर्ती यांनी ‘सुरक्षा’, ‘मृगया’, ‘डिस्को डान्सर’, ‘अग्निपथ’ यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये अविस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. ‘मृगया’ (1976) या त्यांच्या पहिल्या चित्रपटानेच त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला होता. ‘डिस्को डान्सर’ (1982) या चित्रपटाने त्यांना अखंड भारतभर प्रसिद्धी मिळवून दिली. त्यांच्या चित्रपटसृष्टीतील दीर्घकालीन योगदानाबद्दल त्यांना ‘दादासाहेब फाळके’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
मिथुन चक्रवर्ती म्हणाले कि, मला याआधी तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. पहिल्यांदा मिळाला तेव्हाचे त्याचे अनेक किस्से आहेत. पहिला पुरस्कार मिळाला तेव्हा यश डोक्यात गेलं होतं. फिल्म इंडस्ट्रीत काळा रंग चालणार नाही, असं मला म्हटलं गेलं. खूप अपमान झाला. तेव्हा विचार करायचो की मी काय करु. देवाला विचारायचो माझा रंग बदलू शकत नाही का? मी देवाकडे खूप तक्रार करायचो की मला सगळ्यासाठीच संघर्ष करायला लागतोय. आज हा पुरस्कार मिळाल्यानंतर मी तक्रार करणं सोडून दिलं, असं मिथुन चक्रवर्ती म्हणाले.
President Droupadi Murmu conferred Dadasaheb Phalke Lifetime Achievement Award upon Shri Mithun Chakraborty. A Padma Bhushan awardee, Shri Mithun Chakraborty is recipient of three National Film Awards. During his career spanning nearly five decades, he has essayed many memorable… pic.twitter.com/xWRt94BPWL
— President of India (@rashtrapatibhvn) October 8, 2024