Cyclone Michaung : नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात ‘मिचौंग’ चक्रीवादळ तयार झाले आहे. यामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे. पाच डिसेंबर रोजी आंध्र प्रदेशामधील नेल्लोर आणि मछलीपट्टणम किनारपट्टीवर मिचौंग चक्रीवादळ धडकणार आहे. सोमवारी हे वादळ उत्तर तामिळनाडूत आले आहे. या वादळामुळे किनारपट्टीवर ११० किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहे. चक्रीवादळाच्या तीव्रतेची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
118 ट्रेन रद्द, सार्वजनिक सुटी
चक्रीवादळाच्या धोका लक्षात घेऊन 118 रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये हावड-चेन्नई एक्सप्रेस, शालीमार-चेन्नई कोरोमंडल एक्सप्रेस, पुडुचेरी-हावडा एक्सप्रेस, एलेप्पी-धनबाद एक्सप्रेस, टाटानगर-एर्नाकुलम एक्सप्रेस, कन्याकुमारी-डिब्रूगढ विवेक एक्सप्रेस, चेन्नई-पुरी एक्सप्रेस यांचा समावेश आहे. तामिळनाडूत 4,967 बचाव शिबिर तयार करण्यात आले आहे. राज्य सरकारने चेन्नई, तिरुवल्लूर, कांचीपूरम आणि चेंगलपट्टूमध्ये सार्वजिनक सुटी जाहीर केल आहे.
एनडीआरएफच्या टीम तैनात
चक्रीवादळाच्या धोक्यामुळे केंद्रीय कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पुडुचेरीत एनडीआरएफच्या २१ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच आठ अतिरिक्त टीम राखीव ठेवण्यात आल्या आहेत.