नवी दिल्ली: मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील पराभवानंतर काँग्रेसने संघटनेत मोठे बदल केले आहेत. पक्षाने कमलनाथ यांना मध्य प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हटवून जितू पटवारी यांची नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. तर उमंग सिंगर यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद तर उप हेमंत काटाणे यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याआधी गोविंद सिंह विरोधी पक्षनेते होते.
पटवारी आणि उमंग हे दोघेही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांच्या विरोधी गटातील मानले जातात. मध्य प्रदेश निवडणुकीतील पराभवानंतर पक्षात मोठे बदल होणार असल्याची चर्चा होती.
कांग्रेस अध्यक्ष श्री @kharge द्वारा श्री @jitupatwari को मध्य प्रदेश कांग्रेस कमेटी का प्रदेश अध्यक्ष, श्री @UmangSinghar को CLP लीडर और श्री @HemantKatareMP
को डिप्टी लीडर नियुक्त किया गया है।आपको नई जिम्मेदारी की बधाई एवं भविष्य के लिए शुभकामनाएं। pic.twitter.com/sF2A3ScvcK
— Congress (@INCIndia) December 16, 2023
चरणदास महंत यांची छत्तीसगडच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती
छत्तीसगडमध्ये विधानसभेचे माजी अध्यक्ष चरणदास महंत यांना काँग्रेसने विरोधी पक्षनेते बनवले आहे. दीपक बैज यांना प्रदेशाध्यक्षपदी कायम ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे छत्तीसगडमध्ये भाजपच्या आदिवासी सीएम कार्डला टक्कर देण्यासाठी काँग्रेसने आदिवासी समाजातून विरोधी पक्षनेते आणि प्रदेशाध्यक्ष दोन्ही केले आहेत.
कांग्रेस अध्यक्ष श्री @kharge द्वारा श्री @DrCharandas को छत्तीसगढ़ का CLP लीडर नियुक्त किया गया है।
आपको बधाई एवं भविष्य के लिए शुभकामनाएं। pic.twitter.com/UbQbhRx9F4
— Congress (@INCIndia) December 16, 2023
जितू पटवारी यांचा पराभव
मध्य प्रदेशातील राऊ विधानसभा मतदारसंघातून जितू पटवारी यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यांचा भाजपच्या मधु वर्मा यांनी 35 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. 2013 आणि 2018 च्या विधानसभा निवडणुकीत पटवारी या जागेवरून विजयी झाले होते.
मध्य प्रदेशातील 230 जागांपैकी भाजपने 163 जागा जिंकल्या असून पक्षाने मोहन यादव यांना मुख्यमंत्री बनवले आहे. या निवडणुकीत काँग्रेसला केवळ 66 जागा जिंकता आल्या. त्याचवेळी छत्तीसगडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला. येथे पाच वर्षे सत्तेत असलेल्या पक्षाला 90 पैकी 35 जागा मिळाल्या. तर भाजपने 54 जागा जिंकल्या आणि विष्णू देव साय यांना मुख्यमंत्री केले आहे.
दोन्ही राज्यांतील पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्लीत आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीपासून संघटनेत बदलांची चर्चा होती. राजस्थानमध्येही पक्ष असाच बदल करू शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत हा बदल महत्त्वाचा मानला जात आहे.