नवी दिल्ली: भारताने पहलगाम हल्ल्याच्या उत्तरादाखल केलेल्या कारवाईत पाकिस्तानमधील शंभरहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. त्यानंतर पाकिस्तानचा भारतातील 15 शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न होता. अशी माहिती संरक्षण मंत्रालयाकडून समोर येत आहे. मात्र, पाकिस्तानचा डाव भारताने उधळून लावलाआहे.
संरक्षण मंत्रालयाकडून समोर आलेल्या माहितीनुसार, भारताच्या 15 शहरांवर पाकिस्ताने मिसाईल हल्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने 7 मे आणि 8 मे च्या रात्री ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून भारतातील श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, अवंतीपुरा, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नाल, फलोदी, उत्तरलाई आणि भूज यासह उत्तर आणि पश्चिम भारतातील स्थळांवर अनेक लष्करी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली.
मात्र, याला चोख प्रतिउत्तर देत, एकात्मिक काउंटर यूएएस ग्रिड आणि हवाई संरक्षण प्रणालींनी पाकिस्तानने केलेलं लक्ष्य निष्क्रिय केलं गेलं आहे. या हल्ल्यांचे अवशेष अनेक ठिकाणांहून सापडत आहेत जे पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यांना सिद्ध करतात.