Bank Holidays In January 2024 : नवीन वर्ष सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. नवीन वर्ष सुरु झाले की, अनेकांना सगळ्यात आधी कॅलेडरमध्ये पाहायचे असतात त्या सुट्ट्या. सुट्टया म्हटलं की, बाहेर जाण्याचे प्लान अनेकांचे सुरु होतात. अशातच आरबीआयने आपली बँक हॉलिडे लिस्ट अपडेट केली आहे. वर्षाच्या पहिल्या महिन्यात १६ दिवस बँका बंद राहणार आहेत.
१६ दिवसांच्या बँक सुट्टयांमध्ये सर्व रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार यांचा समावेश असणार आहे. आजकाल सर्व डिजिटल झाल्यामुळे बँकाची कामेही ऑनलाईन होतात. परंतु काही कामांसाठी बँकेत जाणे आवश्यक असते. ज्यांना बँकेत जाण्याची गरज आहे, त्यांनी बँकेच्या जानेवारीच्या सुट्टीची यादी एकदा तपासून पाहावी.
बँक ग्राहकांसाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात मकर संक्रांती, प्रजासत्ताक दिन आणि अनेक सरकारी सुट्टया असल्याने बँका बंद राहाणार असल्या तरी मोबाईल बँकिंग, UPI आणि इंटरनेट बँकिंगद्वारे तुम्ही तुमचे काम पूर्ण करु शकता.
जानेवारीत या दिवशी बँका राहणार
- १ जानेवारी- नववर्षाभिनंदन
- ७ जानेवारी – रविवार
- ११ जानेवारी – मिशनरी डे (मिझारोम)
- १२ जानेवारी – स्वामी विवेकानंद जयंती (पश्चिम बंगाल)
- १३ जानेवारी – दुसरा शनिवार१४ जानेवारी – रविवार
- १५ जानेवारी – पोंगल/ थिरुवल्लुवर (तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश)
- १६ जानेवारी – तुसू पूजा (पश्चिम बंगाल आणि आसाम)
- १७ जानेवारी – गुरु गोविंद सिंह जयंती
- २१ जानेवारी – रविवार
- २३ जानेवारी – नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती
- २५ जानेवारी – राज्य दिन (हिमाचल प्रदेश)
- २६ जानेवारी – प्रजासत्ताक दिन
- २७ जानेवारी – चौथा शनिवार
- २८ जानेवारी – रविवार
- ३१ जानेवारी – मी-दाम-मी-फी (आसाम)