नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल मानल्या जाणाऱ्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगण या चार राज्यांच्या विधानसभा निवडणकीची मतमोजणी आज, रविवारी होत आहे. या निवडणुकीत चारही राज्यांतील दिग्गजांचे राजकीय भवितव्य पणाला लागले असून, दुपापर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होईल.
निवडणुकीच्या मतमोजणी आणि निकालाच्या प्रत्येक घडामोडीच्या लाईव्ह अपडेट्स…
- मध्यप्रदेशात सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपची मोठी आघाडी, बहुमताचा आकडा पार
-
Rajasthan Election Result 2023 Live: भाजपाची पुन्हा आघाडी!
राजस्थानमध्ये भाजपानं पुन्हा आघाडी घेतली असून आता भाजपा ९० जागांवर आघाडीवर असून काँग्रेस ७९ जागांवर आघाडीवर आहे.
- Rajasthan Election Result 2023 Live: मतमोजणीचा पहिला कौल हाती…
मतमोजणीच्या पहिल्या अर्ध्या तासात काँग्रेसनं भाजपावर काहीशी आघाडी घेतली आहे.
काँग्रेस – ४९
भाजपा – ४५
इतर – २
- Madhya Pradesh: मतमोजणीला सुरुवात, मध्य प्रदेशमध्ये भाजपा ८, तर काँग्रेस ७ जागांवर पुढे
मध्य प्रदेशमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीलाच भाजपा ८ मतदारसंघांमध्ये पुढे आहे, तर काँग्रेसला ७ जागांवर आघाडी मिळाली आहे. यावरून मध्य प्रदेशमध्ये दोन्ही पक्षांत ‘काँटे की टक्कर’ असल्याचं दिसत आहे.
- Rajasthan Election Result 2023: पोस्टल मतमोजणीतील पहिला कौल काँग्रेसच्या बाजूने!
पोस्टल मतमोजणीतील पहिला कौल काँग्रेसच्या बाजूने.. काँग्रेस १२ जागांवर आघाडीवर, भाजपा १०!
- चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. पहिला कल काही वेळातच येणार
-
आम्ही मध्य प्रदेशमध्ये १२५ ते १५० जागा जिंकू – नरोत्तम मिश्रा
आम्ही मध्य प्रदेशमध्ये १२५ ते १५० जागा जिंकू आणि राज्यात भाजपाचंच सरकार स्थापन होईल. आता केवळ काही तासांचा अवधी आहे.
– नरोत्तम मिश्रा (भाजपा नेते, मध्य प्रदेश मंत्री)