लाहोर: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानविरुद्ध “ऑपरेशन सिंदूर” अंतर्गत कारवाई करत आहेत. या कारवाईत पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यांवर हवाई हल्ले करण्यात आले आहेत. अहवालांनुसार, भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यांना लक्ष्य केले, ज्यामुळे दहशतवादी गटांना मोठा धक्का बसला. पाकिस्तानने ८ मे रोजी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय सैन्याने हल्ले यशस्वीरित्या परतवून लावले. दोन्ही देशांमध्ये गोलीबारांची भूमिका सुरूच आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारताने केलेल्या हल्ल्याचा लाहोर विमानतळावर परिणाम झाला असून सुरक्षा उपाययोजना वाढल्या आहेत. अनेक उड्डाणे रद्द करण्यात आले आहेत. दरम्यान, भारताने केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानने गुगलवर सर्वाधिक काय सर्च केले याबद्दलची अधिक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी नागरिकांनी “ऑपरेशन सिंदूर”, “सिंदूरचा अर्थ,” “भारत क्षेपणास्त्र हल्ला,” आणि “पाकिस्तान क्षेपणास्त्र हल्ला” असे किवर्ड सर्वाधिक सर्च केल्याचे वृत्त आहे. इतर ट्रेंडिंग विषयांमध्ये “भारत विरुद्ध पाकिस्तान युद्ध,” “पांढरा ध्वज,,” आणि “लाहोर विमानतळ” यांचा समावेश आहे.