नवी दिल्ली: पाकिस्तानच्या लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्याबाबत मोठा खुलासा झाला आहे. माहितीनुसार, जेव्हा भारत लाहोरपासून रावळपिंडीपर्यंत पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक करत होता, तेव्हा असीम मुनीर एका बंकरमध्ये लपून बसला होता. तो जवळपास 3 तास बंकरमध्ये लपलेला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, भारताने पाकिस्तानविरुद्ध प्रत्युत्तरात्मक कारवाई करत रावळपिंडीमधील नूर खान एअरबेसवर स्ट्राईक केला. त्याच वेळी मुनीर हा त्या एअरबेसलगत असलेल्या आपल्या शासकीय निवासस्थानी उपस्थित होता. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्याला तातडीने बंकरमध्ये हलविण्यात आले. संपूर्ण स्ट्राईक दरम्यान मुनीर बंकरमध्ये लपून बसला होता.
असीम मुनीर तीन तास बंकरमध्ये लपून होता…
गुप्तचर सूत्रांचे म्हणणे आहे की, भारताने ज्या एअरबेसवर हल्ला केला, त्याच्यापासून थोड्याच अंतरावर असीम मुनीर यांचे शासकीय निवासस्थान आहे. स्ट्राईक होताच पाक लष्कर सतर्क झाले. लष्कराच्या जवानांनी मुनीरला तातडीने बंकरमध्ये जाण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्याला शासकीय निवासस्थानातून बाहेर काढून बंकरमध्ये हलविण्यात आले. सकाळी स्ट्राईक संपेपर्यंत तो तिथेच लपून बसला होता.
पाकिस्तानच्या लष्करावर मुनीरचे नियंत्रण…
असीम मुनीर याच्याकडेच पाकिस्तानच्या लष्कराचे संपूर्ण नियंत्रण आहे. पाकिस्तानच्या नियमांनुसार, लष्करप्रमुखालाच अण्वस्त्र वापरण्याचे अधिकार दिले गेले आहेत. म्हणजेच अणु नियंत्रणाची जबाबदारीही असीम मुनीर याच्याकडेच आहे. पाकिस्तानमध्ये लष्करप्रमुखाचे पद अत्यंत शक्तिशाली मानले जाते. सर्व मोठे निर्णय लष्करप्रमुखच घेत असतो.
कुटुंब ब्रिटनला तर मुनीर घरात एकटाच होता
भारताने जेव्हा रावळपिंडीतील लष्करी बेसवर हल्ला केला, त्यावेळी असीम मुनीर आपल्या शासकीय निवासस्थानी एकटाच उपस्थित होता. प्रत्यक्षात भारतासोबत तणाव सुरू होताच मुनीरने आपले संपूर्ण कुटुंब ब्रिटनला पाठवले होते. याबाबत पाकिस्तानमध्ये त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.