हैदराबाद : तेलंगणाच्या हैदराबादमध्ये एक अजब घटना घडली आहे. वऱ्हाडींना पंगतीत मटणाची नळी वाढली नसल्यामुळे लग्न मोडल्याची घटना घडली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी मुलाच्या कुटुंबीयांना वाद मिटवण्याचा सल्ला दिला. मात्र त पोलिसांनाही मिटला नाही. मुलगी निजामाबादमधील राहणारी आहे, तर मुलगा जगतियाल येथील आहे. नोव्हेंबर महिन्यात मुलीच्या घरीच साखरपुडा झाला.
मुलीकडील लोकांनी पाहुण्यांसाठी मांसाहारी जेवण ठेवलं होतं. परंतु जेवणात मटणाची नळी नसल्याची तक्रार नावरदेवाकडील लोकांनी केली. साखरपुड्यापूर्वी झालेल्या बोलणीत जेवणाच्या पदार्थामध्ये मटणाच्या नळीचा समावेश नव्हता, असा दावा मुलीकडील लोकांनी केला. मात्र मुलाकडील मंडळी ऐकण्यास तयार नव्हती. वाद इतका वाढला की अखेर पोलिसांना यांच्यात मध्यस्थी करावी लागली.
पोलीस अधिकाऱ्यांनी मुलाच्या कुटुंबीयांना वाद मिटवण्याचा मिटवण्याची विनंती केली, पण ते पोलिसांनाही जुमानत नव्हते. बोलणी झाली तेव्हा मेन्यूत मटणाची नळी असेल, असं ठरलं होतं. मात्र, मुलीकडील लोकांनी जाणीवपूर्वक मेन्यूतून मटण नळी रद्द करत आमचा अपमान केला आहे, असं नावरदेवाकडील मंडळीचे म्हणणे होते. अखेर मुलाच्या कुटुंबीयांनी साखरपुडा अर्ध्यात सोडत लग्न मोडल्याचं जाहीर केलं. ही घटना समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.