Thursday, April 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पत्रकारांना सोयी-सुविधा देण्यासाठी राज्यसरकार कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजित पवार

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 27 December 2023, 12:09

राजेंद्रकुमार शेळके

 

पुणे : राज्य शासनाच्यावतीने पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना, शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतात. आगामी काळातही पत्रकारांना विविध सोयी-सुविधा देण्यासाठी राज्यसरकार कटिबद्ध राहील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड शहरातील ‘हॉटेल इलेव्हन २३’ येथे आयोजित ‘पुणे अचिव्हर्स २०२३’ या कॉफीटेबल पुस्तकाचे प्रकाशन आणि पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, माजी आमदार विलास लांडे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, संघटक संजय भोकरे, संघाचे महासचिव डॉ. विश्वास आरोटे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष गोविंद वाकडे, महाराष्ट्र पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष नितीन शिंदे, पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणीचे सदस्य बबन पवार आदी उपस्थित होते. या वेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे हल्ला विरोधी कृती समितीच्या अध्यक्षपदी गोविंद वाकडे व डिजिटल मिडिया अध्यक्षपदी सिद्धार्थ भोकरे यांची निवड झाल्याबद्दल या वेळी पत्र देऊन अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पवार म्हणाले की, आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेच्या माध्यमातून राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा आदरपूर्वक सन्मान करण्यासाठी, त्यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना सन्मानपूर्वक मानधन देण्यात येत आहे. पत्रकारांना दुर्धर आजार, अपघात झाल्यास किंवा आकस्मिक मृत्यू झाल्यास त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधीतून मदत करण्यात येते. या निधीसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ५० कोटी रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. आता आधीचे ५० कोटी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनातील ५० कोटी असे १०० कोटी रुपये झाले आहेत. पत्रकारांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन योग्य तो मार्ग काढण्यात येईल, असेही ते म्हणाले.

राज्य शासनाच्यावतीने घेण्यात आलेले निर्णय, ध्येयधोरणे, उपक्रम नागरिकापर्यंत पोहचविण्याचे काम अतिशय चांगल्याप्रकारे माध्यमांनी केले आहे. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाअंतर्गत करण्यात आलेली कामे तळागळापर्यंत पोहचविण्याचे माध्यमांनी अतिशय चांगले काम केले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन शासनाच्यावतीने त्यांचा पुरस्कार देऊन सन्मानही करण्यात आला. पत्रकारांनी चांगल्या गोष्टी समाजापुढे आणण्यासाठी आणि वाईट गोष्टीला रोखण्यासाठी काम करावे. वस्तुस्थितीदर्शक बातमी दाखविण्याचे काम माध्यमांनी करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले. पुणे अचिव्हर्स २०२३’ या कॉफीटेबल पुस्तकाच्या माध्यमातून समाजातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना समाजापुढे आणण्याचे काम केले आहे. देशाच्या, समाजाच्या प्रगतीत आणि उन्नतीत त्यांचे योगदान आहे. यातून इतरांनीही प्रेरणा घेऊन आपापल्या क्षेत्रात काम करत अपेक्षित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन पवार यांनी केले.

चाकणकर म्हणाल्या की, वंचित, दुर्बल घटकांचा आवाज होण्याचे काम पत्रकारितेने केले आहे. समाजात महिलांवर होणारा अन्याय, अत्याचार माध्यमांनी समोर आणला पाहिजे. घटनेचा सतत पाठपुरावा करुन संबंधित पीडितेला न्याय देण्याची भूमिका ठेवावी. मुंडे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड या औद्योगिक, ऐतिहासिक, अध्यात्मिक नगरीमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करुन त्यांची यशोगाथा कॉफीटेबल पुस्तकाच्या माध्यमातून समाजासमोर आणण्यात आली आहे. प्रास्ताविक भोकरे यांनी केले.

या वेळी पवार यांच्या हस्ते साहित्य, कला, क्रीडा, राजकारण, शिक्षण, उद्योग आदी क्षेत्रातील विविध मान्यवरांना ‘पुणे अचिव्हर्स २०२३’ पुरस्काराचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे महासचिव डॉ. विश्वास आरोटे यांचा शिवरायांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुभाष डोके, पत्रकार संघाचे ब्रँड अम्बेसेडर संजय फुलसुंदर, डॉ. स्वामी शिरकुल, वैदू महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे वृत्तवाहिनी पुणे जिल्हा अध्यक्ष अतुल परदेशी, पुणे शहर जिल्हा अध्यक्ष राकेश वाघमारे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष बाजीराव फराकटे, जेष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर नवले यांसह पदाधिकारी उपस्थित होते. आभार प्रदर्शन नितीन शिंदे यांनी केले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

दौंडमध्ये बेकायदेशीर पिस्तुलसह एकाला अटक ; 53 हजारांचा मुद्देमाल जप्त, गुन्हे शोध पथकाची कारवाई..

Thursday, 23 April 2026, 13:04

Mallikarjun Kharge : खर्गे आधी मोदींना म्हणाले दहशतवादी ; टीका होताच खर्गेंचा खुलासा, अण्णा द्रमुक-भाजप युतीवर टीका..

Thursday, 23 April 2026, 12:16

Pune Crime : दापोडी पोलिसांची धडक कारवाई; दोन तरुणांकडून देशी पिस्तुले, जिवंत काडतुसे जप्त

Thursday, 23 April 2026, 12:07
CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 82

Sasvad Crime News : किरकोळ कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी ; परस्परविरोधी गुन्हे दाखल, खुनाचा प्रयत्न केल्याचा दोन्ही बाजूंचा आरोप

Thursday, 23 April 2026, 11:54

Pune Crime : बारावीच्या विद्यार्थ्यावर फरशीच्या तुकड्याने जीवघेणा हल्ला , तिघांविरुद्ध गुन्हा

Thursday, 23 April 2026, 11:37

Hadapsar News : लोखंडी घसरगुंडी अंगावर पडून ४ वर्षांच्या चिमूकलीचा दुर्दैवी मृत्यू, चेअरमन आणि कार्यकारिणी सदस्यांविरुद्ध गुन्हा

Thursday, 23 April 2026, 11:10
Next Post
90 crore works approved in standing committee meeting by PMC

Pune News : पुणे महापालिकेची आक्रमक भूमिका; पाणीपट्टी न भरल्यास पाणीपुरवठा बंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.