कोकण: मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ९१ फूट उंचीच्या भव्य पुतळा उभारला आहे. प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल सुतार यांनी तयार केलेल्या या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. हा पुतळा कांस्यापासून बनलेला आहे आणि ९१ फूट उंचीचा असून १० फूट उंचीचा पेडेस्ट्रॉल आहे. हा पुतळा कठोर हवामानाचा सामना करू शकतो आणि किमान १०० वर्षे टिकेल असे सांगण्यात आले आहे. कोकणात वेगवेगळ्या प्रकारचे तुफान आणि वादळे येतात. या सर्वांचा अभ्यास करून हा पुतळा तयार करण्यात आला आहे.
फडणवीस यांनी सांगितले कि, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा देशातील सर्वात उंच पुतळा आहे. या अनावरण समारंभाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मंत्री नारायण राणे आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
येथे पाहा, व्हिडीओ
छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩#LIVE | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते किल्ले राजकोट, सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन व दर्शन@Dev_Fadnavis#Maharashtra #DevendraFadnavis #ChhatrapatiShivajiMaharaj https://t.co/a7QBvRTpZQ
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 11, 2025
पुतळा बनवण्यासाठी जवळपास 6 ते 8 मिलिमीटर जाडीचे कांस्य वापरण्यात आल्याचे वृत्त आहे. छत्रपती शिवरायांचा हातात तलवार घेतलेला पुतळा तयार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अनावरण सोहळ्याचे फोटो पोस्ट केले आहेत. दरम्यान, राजकोट येथील पुतळा कोसळ्याच्या घटनेनंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मी आणि अजितदादांनी पुन्हा याच ठिकाणी पुतळा पुन्हा दिमाखात उभारण्याचा निर्धार केला होता, असे फडणवीस यांनी सांगितले.