Andhra Pradesh Accident : आंध्र प्रदेशामधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथील अनंतपूर जिल्ह्यातील गारल्डिन मंडळातील थलागासपल्लेजवळ आंध्र प्रदेश रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (एपीआरटीसी) येथे बस आणि ऑटोची जोरदार धडक झाल्याची घटना घडली आहे. यावेळी त्या ऑटोमध्ये शेतमजूर प्रवास करत होते. या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे तर चार जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमींना अनंतपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या घटनेसंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, कुत्तालुरू मंडलातील नेलुताला गावामधील 12 शेतमजूर नेहमीप्रमाणे गार्डीनमध्ये कामावर गेले होते. त्यादरम्यान ते परतीच्या प्रवासात ऑटोने जात होते. तितक्यात विरुद्ध दिशेने येणाऱ्या एपीआरटीसी बसने ऑटोला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातानंतर दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर रुग्णालयात नेत असताना दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर उपचारादरम्यान आणखी तिघांचा मृत्यू झाला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळाची धाव घेत पाहणी केली. पोलिसांनी एपीआरटीसी बस चालकाला ताब्यात घेतले आहे. याबरोबरच मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले. यावेळी त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून पाच लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
పొట్టకూటి కోసం కూలీ పనులకు వెళ్లొస్తూ వారు రోడ్డు ప్రమాదంలో చనిపోవడంపై ఆవేదన వ్యక్తం చేశారు. బాధిత కుటుంబాలను ప్రభుత్వం ఆదుకుంటుందని భరోసా ఇచ్చారు. మరణించిన వారి కుటుంబానికి రూ.5 లక్షల చొప్పున పరిహారం ప్రకటించారు. (2/3)
— CMO Andhra Pradesh (@AndhraPradeshCM) November 23, 2024