मुंबई : जगात असा कोणी नाही ज्याला सँडविच आवडत नाही. जंकफूड लव्हर, हेल्थ फ्रिक्स, लहान, मोठे सर्वांचं ऑल टाईम फोवरेट आहे सँडविच. पण सध्या सँडविच खूपच चर्चेत आलं आहे. कारण..त्याची किंमत आहे. 100-200 नव्हे तर तब्बल 10 कोटींचा हा सँडविच आहे. त्यातही तो उष्टा आहे. फेसबुकवर त्या अर्ध्या उष्ट्या सँडविच्या विक्रीचा पोस्ट व्हायरल होत आहे.
साधारणपणे एका सँडविचची किंमत फार तर फार 100-200 पर्यंत असते. विशेष म्हणजे 30 रूपयांपासून देखील सँडविच मिळते. मात्र, फोसबुकवर पोस्ट झालेल्या या सँडविचची किंमत ऐकून लोकांना चांगलाच धक्का बसला आहे. उष्टे सँडविच आणि तेही तब्बल 10 कोटी रूपयांचे हे सँडविच आहे. तुम्ही विचार कराल की, या सँडविचमध्ये असे काय खास आहे? ज्याची किंमत तब्बल 10 कोटी आहे. विशेष म्हणजे या सँडविचची विक्री ही फेसबुकवर का होत आहे?
या सँडविचची विक्री करण्याचे खरे कारण म्हणजे त्या सँडविचच्या मालकाला ते सँडविच पूर्ण खाल्ले जात नाहीये. यामुळेच तो विक्री करत आहे. इतकी जास्त सँडविचची किंमत असल्याने हे सँडविच आता तूफान चर्चेत आल्याचे बघायला मिळतंय. आता या व्यक्तीची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असून अनेकजण या पोस्टवर कमेंट करताना दिसत आहेत.
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, इंग्लॅंडमध्ये राहणाऱ्या लीस्टर नावाच्या व्यक्तीने या सँडविचची विक्रीची पोस्ट शेअर केली. यासोबतच त्याने या सँडविचचा फोटो देखील शेअर केलाय. ग्रिल्ड, हे अर्धवट खाल्ले सँडविच आहे. यामध्ये चीज आणि थोडेसे मीट देखील आहे. हे सँडविच खूप क्रिस्पी असल्याचे सांगितले जातंय. मात्र, याची किंमत हैराण करणारी नक्कीच आहे.