मुंबई : मुंबईतील अंधेरी परिसरातून दोन बांग्लादेशी तरुणांना अटक करण्यात आली आहे. सद्दाम जन्नतुन हुसैन आणि बाबर याकूब उल्ला उर्फ बाबू अशी त्यांची नावे आहेत. अंधेरी पोलिसांच्या एटीएस पथकाने अटक केली आहे. या दोघांनाही न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अंधेरी सहार रोड गोखले पुलाखाली वेल्डरचे काम करण्यासाठी हे दोन बांगलादेशी तरुण येणार असल्याची माहिती एटीएस पथकाला मिळाली होती. या माहितीची खात्री करताच अंधेरी पोलिसांच्या एटीएस पथकाने साध्या वेशात पाळत ठेवून सद्दाम हुसेन १९ वर्षीय तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत तो बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले.
दुसऱ्या कारवाईत याच पथकाने बाबर उल्ला या 24 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलं. त्याच्याकडे भारतीय नागरिकत्व सिद्ध करणारी कोणतेही कागदपत्र आढळली नाहीत. मात्र त्याचे अनेक फोन कॉल्स हे बांगलादेशमध्ये झाल्याचे आढळल्याने त्याला देखील ताब्यात घेतल आहे.