मुरबाड: मुरबाड तालुक्यातील जांभुर्डे गावात एका ५२ वर्षीय व्यक्तीची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या करण्यात आली. गणेश भोपी असे आरोपी असल्याचे समोर आले आहे. आरोपीने भालचंद्र बिऱ्हाडे या पीडित तरुणावर पूर्ववैमनस्यातून भर चौकात कुऱ्हाडीने सपासप वार करून हत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे आणि पोलिसांनी तपास सुरू केला आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते, आरोपीने बिऱ्हाडे हे गावातील चौकातील रिक्षा स्टँडकडे जात असताना त्याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. हा हल्ला इतका क्रूर होता की, बिऱ्हाडेचे डोके दोन भागात विभागले गेले होते. घटना इतकी क्रूर होती कि, कोणीही भालचंद्र यांना वाचवण्यासाठी समोर आले नाही. पोलिसांनी तपास करत काहीतासात आरोपीला अटक केली आहे आणि त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश शिंदे, पोलीस निरीक्षक संदीप गिते आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महादेव खोमणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस विभागाने तपास अधिक तीव्र केला आहे. . या घटनेमुळे परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चिंता निर्माण झाली आहे आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि या गुन्ह्यात आणखी कोणी सहभागी आहे का याचा शोध पोलिस घेत आहेत.