मुंबई: मुंबईत आज राज्य मंत्रीमंडळाची बैठक झाली. या बैठकीत यंदाचा ऊस गळीत हंगाम 1 नोव्हेंबर पासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यंदा 89 लाख मेट्रिक टन साखरेच्या उत्पादनाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, यावर्षी कमी ऊसाच्या उत्पादनाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. यावर्षी 89 लाख मेट्रिक टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. ऊसाच्या उत्पादनात मागील वर्षाच्या तुलनेत पाच टक्के घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळं साखर उत्पादनात देखील यावर्षी काही प्रमाणात घट होणार आहे.
हेही वाचा:
Narayan Rane : मी 96 कुळी मराठा, कुठलाही मराठा कुणबी दाखला घेणार नाही: नारायण राणे
Hardik Pandya: भारताला मोठा झटका, हार्दिक पांड्याची दुखापत गंभीर; स्कॅनसाठी रुग्णालयात