मुंबई : राज्यात महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. राज्यात महाविकास आघाडीचा लोकसभेचा फॉर्मुला ठरला असल्याची माहिती समोर आली आहे. 23 शिवसेना, 15 राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि 10 काँग्रेस असा फॉर्मुला समोर आला आहे आहे.
लोकसभेच्या 48 जागांपैकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने 23 जागा लढण्यावर ठाम आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुंबई 4, पश्चिम महाराष्ट्र 3, कोकण 2, ठाणे 2, पालघर 1, विदर्भ 4, मराठवाडा 5, तसेच उत्तर महाराष्ट्रातील एका जागेवार दावा केला आहे.
दरम्यान, शिरूरची जागा राष्ट्रवादीसाठी सोडून ईशान्य मुंबईच्या जागेसाठी शिवसेना ठाकरे गट आग्रही आहे. शिवसेना आपली ताकद असलेल्या अमरावतीची जागा सोडून अकोला जागा वंचितला देण्याची तयारीत आहे. दुसरीकडे जागावाटपावरुन वाद होऊ नये म्हणून प्रकाश आंबेडकर यांच्या वचिंत आघाडीने 12-12-12-12 असा एक फॉर्म्युला महाविकास आघाडीला दिला आहे. त्यानुसार काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट आणि वंचित या सर्वांनी प्रत्येकी 12 जागा लढवाव्या असं आंबेडकरांचं म्हणणं आहे.
‘या’ 23 जागावर ठाकरे गट ठाम
- रामटेक
- बुलढाणा
- यवतमाळ वाशीम
- हिंगोली
- परभणी
- जालना
- संभाजीनगर
- नाशिक
- पालघर
- कल्याण
- ठाणे
- मुंबई उत्तर पश्चिम
- मुंबई दक्षिण
- मुंबई ईशान्य/शिरूर
- मुंबई दक्षिण मध्य
- रायगड
- रत्नागिरी सिंधुदुर्ग
- मावळ
- शिर्डी
- धाराशिव
- कोल्हापूर
- हातकणंगले – ( स्वाभिमानी शेतकरी संघटनासाठी सोडू शकतात)
- अकोला – (वंचित बहुजन आघाडीसाठी सोडू शकतात)