नवी दिल्ली : राज्यसभा सदस्य आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल मुंबईतून लोकसभा निवडणूक लढण्याचे निश्चित झाले आहे, याबाबतची माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्रीय निवडणूक समिती लवकरच करणार उमेदवारी घोषित करणार आहे. गोपाळ शेट्टी यांच्या जागेवर पीयूष गोयल यांची उमेदवारी घोषित होणार आहे. राज्यसभेतील अनेक मंत्री लोकसभा निवडणूक लढत आहे म्हणून पीयूष गोयल यांना लोकसभा उमेदवारी देण्यात येणार आहे.