मुंबई: भारत-पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती असताना बॉलीवूड अभिनेत्री आणी खासदार कंगणा रणावत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये कंगणाने पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. भारतीय लष्कराने सुरु केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर पाकिस्तानने भारताच्या अनेक भागांवर विशेषतः सीमेलगत भागात क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ला करण्याचा नापाक प्रयत्न केला. त्यावर आता बॉलीवूड अभिनेत्री आणी खासदार कंगनाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे.
यामध्ये कंगणाने लिहिले आहे की, ‘ब्लडी कॉक्रोच…भीषण, दहशतवाद्यांनी भरलेला वाईट देश, जगाच्या नकाशावरून मिटवला पाहिजे,’ असे म्हणत कंगणाने संताप व्यक्त केला आहे. यापूर्वी कंगनाने एक व्हिडिओ शेअर केला होता. यात तिने भारतीय S-400 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीचं कौतुक केलं होतं.