मुंबई: भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशने संघटनात्मक पातळीवर महत्त्वपूर्ण फेररचना करत नव्या कार्यकारिणीची घोषणा केली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर केली. अनुभवी नेत्यांसह नव्या आणि युवा चेहऱ्यांना संधी देत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न या बदलांतून दिसून येतो.

नव्या कार्यकारिणीत उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, कोषाध्यक्ष आणि मुख्य प्रवक्ते अशा महत्त्वाच्या पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. महिला, युवा आणि ओबीसी मोर्चांसह विविध आघाड्यांनाही नवसंजीवनी देण्यावर भर देण्यात आला आहे. प्रादेशिक व सामाजिक प्रतिनिधित्वाचा समतोल राखण्याचा प्रयत्न या यादीतून स्पष्ट होतो. काही विद्यमान पदाधिकाऱ्यांना पुनर्नियुक्ती देण्यात आली असून, नव्या चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली आहे.
राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर ही कार्यकारिणी महत्त्वाची मानली जात आहे. बूथस्तरापर्यंत संघटन बळकट करणे, विविध समाजघटकांपर्यंत पोहोच वाढवणे आणि कार्यकर्त्यांना निवडणुकांसाठी सज्ज करणे, हा या फेरबदलामागील उद्देश असल्याचे संकेत आहेत.

प्रमुख नियुक्त्या पुढीलप्रमाणे :
मुख्य प्रवक्ता : नवनाथ बन
प्रदेश उपाध्यक्ष : केशव उपाध्ये, गोपीचंद पडळकर, अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोरगे, संजय भेंडे, रामदास कडस, सुजय विखे पाटील, अर्चना पाटील चाकूरकर प्रिया शिंदे.
सरचिटणीस: संजय कुटे, निरंजन डावखरे, माधवी नाईक, योगेश सागर, राजेश पांडे, सुनील राणे.
चिटणीस : राम सातपुते, संजय कुटे, मंगेश चव्हाण, परिणय फुके, वर्षा डहाळे, संजय जगताप, अर्चना डेहणकर, रोहिणी नायडू, प्रविण घुगे, भैरवी घाक, रेखा कुलकर्णी.
युवा मोर्चा अध्यक्ष : कृष्णराज महाडिक
महिला मोर्चा अध्यक्ष : चित्रा वाघ
ओबीसी मोर्चा अध्यक्ष : योगेश टिळेकर
कोषाध्यक्ष : मिहिर कोटेचा
एकूणच, नव्या कार्यकारिणीद्वारे महाराष्ट्र भाजपने संघटनात्मक बांधणी अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू केला असून, या बदलांचा आगामी राजकीय घडामोडींवर काय परिणाम होतो, याकडे लक्ष लागले आहे.







