Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Land Registration New Rule: जमिनीच्या “NA” अधिकारात सरकारचा मोठा फेरबदल; आता मालकी हक्काची तपासणीच होणार नाही? फसवणुकीचा धोका वाढला

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 24 February 2026, 18:28
Land Registration New Rule: Government's major change in "NA" rights of land; Now there will be no verification of ownership? Risk of fraud increased

पुणे: राज्यात जमिनीच्या अकृषक (Land Registration New Rule) परवानगीसंदर्भातील अधिकारांमध्ये करण्यात आलेल्या बदलांमुळे महसूल आणि बांधकाम क्षेत्रात नव्या वादाला तोंड फुटले आहे. राज्य सरकारच्या नव्या शासन निर्णयानुसार अकृषक परवानगी देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडून स्थानिक नियोजन प्राधिकरणांकडे, म्हणजे महापालिका, नगरपालिका आणि पीएमआरडीएकडे सोपविण्यात आले आहेत. मात्र या निर्णयात सातबारा उताऱ्यावरील मालकी हक्काची तपासणी कोण करणार, याबाबत स्पष्ट उल्लेख नसल्याने महसूल अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. (Latest Marathi News)

 

जमिनीची खरेदी किंवा विकास करण्यापूर्वी सातबारा उताऱ्यावर क्लीअर टायटल आहे का, याची सर्च रिपोर्टद्वारे खात्री केली जाते. मालकी हक्क, वर्ग एक किंवा वर्ग दोनची नोंद, इतर हक्क, इनाम जमीन किंवा नजराणा प्रलंबित आहे का, याची तपासणी ही महसूल विभागाच्या अखत्यारीत येते. मात्र स्थानिक नियोजन प्राधिकरणांना बांधकाम परवानगी देण्याचा अधिकार दिल्यानंतर, जर ही तपासणी न करता विकास परवानगी देण्यात आली, तर पुढे मोठा कायदेशीर गोंधळ निर्माण होऊ शकतो.

कलम 6 ब नुसार इनाम जमिनी संबंधितांना देण्यात येतात. संगणकीकरणाच्या प्रक्रियेत कलम 155 चा गैरवापर झाल्याच्या तक्रारी पूर्वी समोर आल्या आहेत. काही प्रकरणांत सातबारा उताऱ्यावर मूळ मालकांची नावे इतर हक्कांमध्ये दाखल झाली, मात्र जमीन प्रत्यक्षात वर्ग दोनची असल्याचे नंतर स्पष्ट झाले. अशा जमिनीवर न्यायालय किंवा जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आणि नजराणा भरल्याशिवाय विकास करता येत नाही. जर ही प्रक्रिया टाळली गेली, तर पुढे जिल्हा प्रशासनाच्या तपासणीत संबंधित नागरिकांनाच दंड भरावा लागू शकतो.

तसेच कलम 45 नुसार परवानगीशिवाय बांधकाम केल्यास कारवाई कोण करणार, याबाबतही अस्पष्टता आहे. महसूल अधिनियमाच्या कलम 117 अंतर्गत सेवाभावी संस्थांना दिलेल्या वर्ग दोनच्या जमिनीचा अकृषक कर माफ करण्यात आला होता. नव्या निर्णयानंतर अशा जमिनींवर कर आकारला जाईल का, हा प्रश्नही अनुत्तरित आहे.

एकूणच, अधिकारांचे हस्तांतरण वेगवान परवानग्यांसाठी केले असले तरी मालकी हक्क आणि कायदेशीर तपासणीबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे न ठरवल्यास मुंढवा येथील जमीन गैरव्यवहारासारखी प्रकरणे वाढण्याची भीती महसूल अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52

Yawat : रात्रीच्या वेळी होणारे भारनियमन तात्काळ बंद करा – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी 

Monday, 6 April 2026, 19:40
Next Post

वाघोली परिसरात महसूल प्रशासनाचा दणका; बेकायदेशीर क्रशर व दगड खाणींवर कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.