मुंबई: पुणे हिट अँड रन प्रकरणी आरोपीला फायदा पोहचवण्यासाठी पुणे पोलिसांनी तपासात मुद्दाम अनेक घोळ केले आहेत. पहिल्या एफआयआरमध्ये अनेक त्रुटी ठेवल्या होत्या, यावरून पोलिसांच्या कृतीवर शंका उपस्थित होत असल्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
वडेट्टीवार यांनी घाटकोपर प्रकरणी एसआयटी नेमली तशी पुण्याच्या प्रकरणात देखील न्यायिक चौकशी करावी. तसेच पुणे पोलिसांची देखील चौकशी व्हावी, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. पहिल्या एफआयआरमध्ये योग्य कलमे का लावण्यात आली नव्हती? ही दिशाभूल का केली जात आहे? असे सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केले आहेत.
आरोपीला फायदा पोहचवण्यासाठी पुणे पोलिसांनी तपासात मुद्दाम अनेक घोळ केले आहेत. मुळात पहिल्या FIR मध्ये अनेक त्रुटी ठेवल्या होत्या यावरून पोलिसांच्या कृतीवर शंका उपस्थित होत आहे.
घाटकोपर प्रकरणी SIT नेमली तशी पुण्याच्या प्रकरणात देखील न्यायिक चौकशी करावी. आणि पुणे पोलिसांची देखील… https://t.co/b6FcUkyMVv
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) May 22, 2024